‘आई तुळजाभवानी’ मालिकेत रंगणार तुळजाई-महादेव भेटीचा अद्भुत प्रसंग!
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ सध्या एका अत्यंत ह्रदयस्पर्शी भावनिक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकीकडे असुरांची कारस्थानं वाढत असताना, दुसरीकडे तुळजाई आणि महादेव यांच्यातील आध्यात्मिक व भावनिक नात्याची नवी बाजू प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. आगामी भागांत या दोघांच्या भेटीचा एक अद्भुत आणि विलक्षण असा डोळ्याचे पारणे फेडणारा प्रसंग पाहायला मिळणार असून, या भेटीमुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे. ‘आई तुळजाभवानी’, ‘चातुर्मास पर्व’ दररोज, रात्री 8:50 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
गावात ‘महादू’च्या रूपात वावरणाऱ्या महादेवांचं गुपित आता तुळजाच्या लक्षात आलं आहे. मात्र, महादेवांनी आजवर अप्रत्यक्ष मदत केली पण ओळख लपवून लपंडाव खेळला याची गोड परतफेड करण्यासाठी तुळजाने आता हा लपंडावाचा डाव तिच्या बाजूने पुढे नेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तुळजाईने एक अनोखी माया रचली आहे. त्यानुसार, एका निर्जन माळरानावर महादेवांना सोनेरी स्पार्कलने चमकणारं एक मायावी पान सापडतं आणि तिथूनच या रहस्यमय खेळाची सुरुवात होते. पैंजणांचा नाद, हवेत उडणारी रंगीत फुलपाखरं आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव अशा जादुई वातावरणात महादेव एका अनोळखी व्यक्तीचा पाठलाग करत एका भव्य धबधब्यापाशी येऊन पोहोचतात. तिथे गावकऱ्याच्या वेशात उभी असलेली तुळजाई जेव्हा त्यांच्यासमोर येते, तेव्हा निसर्गही काही क्षणांसाठी स्तब्ध होतो आणि दोघांमध्ये एक अत्यंत हळवा आणि भावनिक निशब्द संवाद घडतो. हा विलक्षण प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. दुसरीकडे, महिषासुर आणि असुरमाता दीती, तुळजाची शक्ती व तिच्या भक्तांची श्रद्धा मोडून काढण्यासाठी नवनवीन डाव आखत आहेत. त्यावर या भेटीचा काय परिणाम होणार हाही महत्वाचा पैलू या कथाभागात आहे.
या विलक्षण महाभेटीनंतर नियती आणि कर्तव्याच्या बंधनात अडकलेले महादेव आणि तुळजाई एकत्र येणार का, की त्यांच्या नात्यात नवा दुरावा निर्माण होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसंच, महादेवांच्या कुटीत घडणाऱ्या एका अनपेक्षित प्रसंगामुळे या दोघांच्या मानवी रूपातील नात्याची नियतीकडून काशी परीक्षा घेतली जाईल आणि असुरांच्या वाढत्या संकटांवर तुळजाई कशी मात करेल, हे जाणून घेण्यासाठी, नक्की पहा ‘आई तुळजाभवानी’ रात्री ८.५० वा. कलर्स मराठीवर.
