fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest NewsPUNETOP NEWS

धक धक गर्ल माधुरी दीक्षितची PIFF ला भेट

सिनेमातील मोकळ्या जागेचा कलात्मक वापर हे खरे कौशल्य – शाजी करुन

पुणे  : “एखादा सिनेमा बनवताना त्यातील मोकळ्या जागा अर्थात स्पेस ही अधिक कलात्मकरित्या कशी वापरायची हे खरे कौशल्य असते. यासाठी रंगसंगती, पार्श्वसंगीत, आणि इतर घटकांचा वापर उपयुक्त ठरू शकतो, असे मत दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर शाजी करुन यांनी व्यक्त केले.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित मास्टर क्लास’मध्ये करून यांनी ‘थिंकिंग इमेजेस’ याविषयावर मार्गदर्शन केले. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्वाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते उपस्थित होते. कार्यक्रमात नखाते यांनी करुन यांच्याशी संवाद साधला.

मूळचे केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्याचे रहिवासी असणारे ७१ वर्षीय करुन यांनी अनेक चांगल्या कलाकृती घडविल्या आहेत. गेल्या २५ वर्षांतील ते एकमेव व्यक्ती आहेत ज्यांचा चित्रपटाची कांन्स चित्रपट महोत्सवाचा स्पर्धात्मक विभागात निवड झाली होती.

 

करुन म्हणाले, “सिनेमा हे एक प्रवाही माध्यम आहे. त्यामुळे त्यातील मोकळ्या जागेचे महत्व समजून घेण्याची गरज आहे. रंग, संगीत, एखादी वस्तू अशा विविध घटकांच्या सहाय्याने या मोकळ्या जागेचा वापर कलात्मक स्वरूपात करता येऊ शकतो. सिनेमात प्रत्येक इमेज ही मौल्यवान असते. त्यामुळे ती इमेज घडविताना तुमचे लक्ष पूर्णपणे त्यावर केंद्रित असावे. ज्यावेळी तुम्ही तुम्हाला हवी असलेली इमेज यशस्वीपणे साकारता त्यावेळी ती एक ऐतिहासिक कलाकृती बनते.”

आपल्या मनात असणाऱ्या लक्षावधी आठवणी आणि आपल्या डोक्यातील असंख्य विचार यांचे एक विस्तृत चित्रण म्हणजे सिनेमा आहे. गणिती विश्लेषण आणि विज्ञानाच्या जोडीने सिनेमा ही एक उत्कृष्ट कलाकृती बनू शकते. ही कलाकृती तुम्हाला आनंद आणि अध्यात्म या दोघांची अनुभूती देते, असेही करुन यांनी यावेळी सांगितले.

 धक धक गर्ल अर्थात सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी आपले पती डॉ श्रीराम नेने यांच्या सह आज २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ ला भेट दिली. दुपारच्या सुमारास माधुरी दीक्षित यांच्या आरएनएम मुव्हींग पिक्चर्स ची निर्मिती असलेला पंचक हा मराठी चित्रपट महोत्सवा दरम्यान मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागात दाखविला गेला. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान माधुरीने स्क्रीनला आपल्या चित्रपटाच्या टीमसह भेट दिली. त्यांचे पती व सहनिर्माते डॉ श्रीराम नेने हे देखील यावेळी उपस्थित होते. या वेळी माधुरी व डॉ नेने यांनी उपस्थितांसोबत चित्रपटाचा आस्वाद घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading