देशात पाण्यासाठी राज्या – राज्यात युद्धपरिस्थिती का निर्माण केली जाते? – के. चंद्रशेखर राव
नांदेड : देशात मुबलक प्रमाणात पाणी आहे. सरकार दमदार असेल तर प्रत्येक एकरमध्ये पाणी देऊ शकते. पण देशात पाणी असूनही पाण्यासाठी राज्या -राज्यात युद्धजाण्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. देशातील राजकारणाची विचारधारा बादलल्यास पाणी सर्वांना मिळू शकेल. त्यामुळे देशातील पाणी पॉलिसी बदलण्याची गरज आहे, असे मत तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पक्ष आपल्या विस्तारासाठी हायपाय पसरत असून महाराष्ट्राच्या राजकारण उतरण्यासाठी नांदेड येथे रविवारी पहिली सभा झाली़ यावेळी ते बोलत होते़ आपल्या भाषणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने केली़ पुढे बोलतांना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वाधिक नद्या आहेत, मात्र स्वातंत्र्य काळापासून पिण्याच्या व सिंचनासाठी पाणी मिळत नाही़ विविध समस्यांमुळे शेतक-यांवर आत्महत्या करणारी वेळ आली आहे. ही वेळ कोणामुळे आली आहे, याचा विचार करावा़ यापुढे शेतक-यांची परिस्थिती बदलाण्यासाठी अब की बार किमान सरकार, असा बीआरएसने नारा दिला़ देशात शेतक-यांना संख्या ४२ टक्के, मजूर, मजदूर एकत्र आल्यास ५० टक्के पेक्षा अधिक बळ होईल. शेतक-यांनी आमदार, खासदार बनणे गरजेचे आहे़ निवडणुकीत नेते जिंकतात, शेतकरी हरतो़ महाराष्ट्र व देशातील विदारक परिस्थितीला कॉग्रेस, भाजप हे दोन पक्ष दोषी आहेत, असा आरोपही चंद्रशेखर राव यांनी यावेळी केले.
देशात आता शेतकऱ्यांचं सरकार यायला पाहिजे, शेतकऱ्यांनी आता कायदे बनवायला सुरुवात केली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात, हे दु्र्दैव शेतकरी आत्महत्येबाबत सरकारने उत्तरं दिली पाहिजेत, काँग्रेस गेलं आणि भाजप आलं, पण प्रश्न सुटले का? कधी हा घोटाळा तर कधी तो घोटाळा कधी अंबानी तर कधी अदाणी, असं सुरु आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नाही. शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र पुढे आहे, ही खेदाची बाब आहे असे राव म्हणाले.
