Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

सुरांच्या साथीने सैनिकांच्या वीर मरणाचे कृतज्ञ स्मरण !

पुणे : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या स्मृतिदिना निमित्त सुरांच्या साथीने शहीद जवानांच्या वीरमरणाचे कृतज्ञ स्मरण करीत आदरांजली अर्पण करण्यात आली. लीनता ताथवडे,जयश्री सोनवणे,लक्ष्मीबाई साठे,प्रतिभा खटके,मिनाक्षी भिसे,नीलम शिळीमकर या ६ वीरपत्नींचा सन्मान पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि एअर मार्शल (निवृत्त)भूषण गोखले यांच्या हस्ते करण्यात आला.

हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे नुकताच पार पडला. फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि सुशांत यांच्या मातोश्री गीता गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी फाऊंडेशन च्या उपक्रमांची माहिती सांगितली. चंद्रकांत पाटील आणि एअर मार्शल भूषण गोखले यांनी मनोगत व्यक्त केले. फाऊंडेशन चे उपाध्यक्ष सतीश राजहंस यांनी आभार मानले.

यानंतर ‘स्वर्णीम लता आणि दिलीप- देव- राज’ हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘एक शहेनशाह ने’,’होठो पे ऐसी बात’, अशी सदाबहार गाणी अर्चना पोतनीस, संजय पोतनीस, विठ्ठल प्रभू आणि डॉ भक्ती दातार यांनी सादर केली. चिंतन मोढा यांच्या वाद्यवृंदाने साथ केली. कीर्ति रामदासी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाची संकल्पना कॅप्टन सुशांत यांची आई गीता गोडबोले आणि सुशांत यांचा भाऊ सुजय गोडबोले यांची होती. कॅप्टन सुशांत यांना गाण्यांची आवड असल्याने हा कार्यक्रम सादर करण्यात आला.इ.स. २००३ साली वयाच्या २३ व्या वर्षी कॅप्टन सुशांत यांना ‘ऑपरेशन पराक्रम’ दरम्यान जम्मू येथे वीरमरण आले . त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading