मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केले जात आहे – देवेंद्र फडणवीस


मुंबई, दि. 17 – मी ब्राह्मण आहे म्हणून मला टार्गेट केले जात आहे. परंतू, लोकांना माहिती आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी मराठा आरक्षण आणि राज्यासमोर असलेले विविध प्रश्न आदी विषयांवर फडणवीस बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. मात्र, मराठा आरक्षण मुद्द्यावर सावध भूमिका घेत प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, खरं म्हणजे मी हे बोलायला नको आहे. असं बोलणं मला शोभतही नाही. तरीही हे सांगणं गरजेचं आहे. काही लोकांना वाटतं माझी जात ब्रह्मण आहे. त्यामुळे माझ्या माथी काहीही मारलं तरी चालतं. काही चार दोन लोक असे आहेत ते मी ब्राह्मण असल्याने मला लक्ष्य करत असतात. पण, जनतेला वस्तूस्थिती माहिती आहे. लोकांना माहिती आहे. मराठा समाजासाठी मी काय केले आहे. जनता विचार करते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षण प्रकरणी भाजप गंभीर आहे. आम्ही राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करु. केंद्राकडून काही मदत लागली तर तिसुद्धा मिळवून देवू.

पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारने मेगा पोलीस भरती जाहीर केली आहे. आमच्या सरकारनेही ती केली होती. मात्र, आम्हाला ती रद्द करावी लागली. आताही राज्य सरकारने ती जाहीर केली आहे. परंतू, मराठा आरक्षणास स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे त्याचाही राज्य सरकारने विचार करायला हवा. भरती करणे आवश्यक असते. ती करायला हवी. परंतू, त्या आधी मराठा समाजाशी चर्चा करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा काही समाजात आपल्याला डावलल्याची भावना निर्माण होऊ शकते असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: