Tuesday, June 16, 2026
PUNE

दार उघडा दार उघडा देवाचे दार उघडा

पुणे : महाराष्ट्र सरकारने दारुची दुकाने उघडली, तर मंदिरे उघडायला काय अडचण?.. दार उघडा दार उघडा देवाचे दार उघडा… मंदिरे बंद ठेवणा-या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणा देत भंडारा उधळून सारसबाग येथील खंडोबा मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला. पुण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात यावी, याकरीता कार्यकर्त्यांनी खंडोबाची आरती देखील केली. 
श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान व पतित पावन संघटनेतर्फे सारसबाग येथील खंडोबा मंदिर येथे मंदिरे नागरिकांसाठी खुली करावी, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वप्निल नाईक, गौरव घोडे, आशिष पालकर, सचिन कचरे, अविनाश पवार, पदम तिकोने, ॠतिक वाघमारे, आकाश महागडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे आंदोलन व मंदिर उघडून आरती देखील करण्यात आली. 
गौरव घोडे म्हणाले, नागरिकांचे नैराश्य दूर होऊन सद्यपरिस्थिती पूर्ववत होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व मंदिरे त्वरीत खुली करावी. मंदिरे उघडली तर हळद कुंकू, फुले, नारळ व प्रसाद विक्री करणा-यांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच कोरोनाच्या काळात या लोकांचे मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्र सरकारने त्यांनी आर्थिक मदतही करावी, असेही त्यांनी सांगितले. 
स्वप्निल नाईक म्हणाले, महाराष्ट्रात दारुची दुकाने, लॉज-हॉटेल यांसह इतर अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. मात्र, हातावर पोट असलेल्या मंदिराबाहेरील विक्रेत्यांसाठी कोणतीही मदत देखील आलेली नाही. सरकारने त्वरीत मंदिरे न उघडल्यास पतित पावन संघटना मोठया प्रमाणात जनआंदोलन करुन मंदिरे उघडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading