कोरोना – देशात 24 तासात 94 हजार 372 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
नवी दिल्ली, दि. 13 – देशात मागील 24 तासात 94,372 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत ज्यामुळे एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 47,54,357 इतकी झाली आहे. यापैकी 9,73,175 रुग्ण अॅक्टिव्ह असुन उपचार घेत आहेत तर 37,02,596 रुग्णांंना आजवर डिस्चार्ज देण्यात आला आहे, दुर्दैवाने आजवर 78,586 जणांंचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे यापैकी 1,114 बळी हे मागील 24 तासातील आहेत
आयसीएमआर च्या माहितीनुसार देशात आजवर म्हणजेच 12 सप्टेंबर पर्यंत कोरोना चाचणीसाठी एकूण 5,62,60,928 नमुने तपासले गेले. यापैकी काल 10,71,702 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
