fbpx
Monday, May 27, 2024
PUNE

सेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीला आधार कार्ड जोडण्याचे आवाहन

पुणे दि . 10 : – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच रोजगाराच्या प्रशिक्षणाच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड लिंक करुन आपला डेटा अद्ययावत करणे आवश्यक आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व नोकरीइच्छुक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या ज्या बेरोजगार उमेदवारांनी अद्याप आपल्या नोंदणीला आपापले आधार कार्ड जोडले (लिंक) केले नसेल, अशा सर्व उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत ही प्रक्रिया http://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरुन “ऑनलाईन” पध्दतीने पूर्ण करावी.अन्यथा 30 सप्टेंबर 2020 अखेर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल.
प्रत्येक उमेदवाराने तात्काळ http://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरुन आपल्या नोंदणीस आपले आधार कार्ड ऑनलाईन पध्दतीने जोडावे आणि या सर्व सेवा / सुविधांसाठी स्वत:स सक्षम बनवून त्यांचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच आपण अशा प्रकारे आधार नोंदणी जोडण्याबाबत काही अडचणी असल्यास या कार्यालयास punerojgar@gmail.com या ईमेलद्वारे कळवावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणेच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार, यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading