fbpx
Saturday, April 20, 2024
ENTERTAINMENT

हे गणराया.. प्रचंड लोकप्रिय

रावणा स्टुडीओज निर्मित हे गणराया.. ह्या बाप्पाच्या गिताला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. झी म्युझिक मराठी वर प्रदर्शित ह्या गिताला जयंत रेवडेकर ह्यांचे शब्द आहेत आणि विजय-ज्योती ह्या संगीतकार जोडीने संगीत दिले आहे.तर ज्योती भांडे यांनी स्वरबद्ध केलंय. रावणा स्टुडीओजची निर्मिती असलेल्या ह्या गाण्यात प्रतिक्षा जाधव ह्यांनी त्यांच्या सहसुंदर अदाकारी रंग भरलेत. तर त्यांना राज चामरे , स्वरा जाधव यांनी सुंदर साथ दिली आहे. प्रतिक्षाच्या सहजसुंदर प्रसन्ना अदाकारीने गाण्यातील भक्‍तिमय वातावरण अजून खुलून आलेय असा दर्शकांचा अभिप्राय आहे.
हे गणरायाचे दिग्दर्शन रासम पुष्कर ह्यांचे असून त्यांनी देखील पहिल्यांदाच गीत दिग्दर्शन केलंय, हे सगळं बाप्पामुळेच शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं.गीताला सौरभ शेट्ये, अतिश कदम, सोमनाथ वाघमारे ह्यांनी छायाचित्रण, संकलन आणि कला विभागाची जबादारी पेललीय तर ज्योती रासम ह्यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे . रावना स्टुडीओजच्या निर्मिती क्षेत्रातली सुरूवात ह्या गाण्याने आम्ही केलीय. बाप्पाचा आशिर्वाद घेऊन आम्ही निर्मितीत पाउल टाकतोय. ह्या गाण्याप्रमाणेच रसिक आमच्या पुढच्या निर्मितीलाही असा प्रतिसाद देतील, असा विश्‍वास ज्योती रासम ह्यांनी बोलून दाखवला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading