Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENT

सोनी सबच्‍या ‘अनलॉक खुशियाँ’सह जिंका आकर्षक बक्षीसे!

सोनी सब चॅनेल आपल्या प्रेक्षकांना नवीन हृदयस्‍पर्शी ऑन-एअर कॉन्‍टेस्‍ट ‘अनलॉक खुशियाँ’च्‍या माध्‍यमातून आनंद पसरवण्‍यामध्‍ये मदत करण्‍याची संधी देत आहे. ज्‍यामुळे ब्रॅण्‍डच्‍या सर्वत्र आनंद पसरवण्‍याच्‍या प्रयत्‍नाला हातभार लाभेल. प्रेक्षकांना सोनी सबवरील त्‍यांच्‍या आवडत्‍या मालिका पाहण्‍याचा आनंद घेत असताना त्‍यांना पुरस्‍कार जिंकण्‍याची, तसेच सध्‍याच्‍या प्रतिकूल स्थितीदरम्‍यान वंचित लहान मुलांचे कल्‍याण व पुनर्वसनाप्रती योगदान देण्‍याची संधी मिळेल.

या मोहिमेचा भाग म्‍हणून सोनी सब ७ सप्‍टेंबर २०२० ते १८ सप्‍टेंबर २०२० दरम्‍यान सायंकाळी ७ ते रात्री १०.३० या प्राइमटाइममध्‍ये प्रसारित करणा-या मालिकांदरम्‍यान एक अनोखाअल्‍फान्‍युमरिक कोड दाखवेल. प्रेक्षकांना फक्‍त +९१ ९७०२४४४४२० या क्रमांकावर मालिकेच्‍या नावासह हा कोड एसएमएस करायचा आहे. युनिक मोबाइल क्रमांकाच्‍या माध्‍यमातून येणा-या एसएमएससाठी सोनी सब ‘सेव्‍ह दि चिल्‍ड्रेन फाऊंडेशन’ला १ रूपया दान करेल, ज्‍यामुळे वंचित मुलांना मदत होण्‍यासोबत त्‍यांच्‍या पुनर्वसनासाठी योगदान दिले जाईल. याव्‍यतिरिक्‍त सोनी सब दर अर्ध्‍या तासाला पाच भाग्‍यवान विजेत्‍यांना ५,००० रूपयांचे वाऊचर्स जिंकण्‍याची संधी देखील देत आहे.

प्रेक्षकांना हलके-फुलके व मूल्याधारित कन्‍टेन्‍ट सादर करण्‍याचे ब्रॅण्‍ड वचन कायम राखत सोनी सबने नुकतेच नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं’ सुरू केली आहे. तसेच’तारक मेहता का उल्‍टा चष्‍मा’,’अलाद्दिन: नाम तो सुना होगा’,’बालवीर रिटर्न्‍स’,’मॅडम सर’ आणि ‘कॅरी ऑन आलिया’यांसारख्‍या इतर लोकप्रिय मालिकांच्‍या चाहत्‍यांना सर्वसमावेशक व रोमांचक मनोरंजनाचा आनंद मिळत आहे. त्‍यांना मालिकांमध्‍ये नाट्यमय ट्विस्‍ट्स पाहायला मिळत आहेत.

कॉन्‍टेस्‍ट प्रोमोसाठी लिंक: https://www.facebook.com/213241952526/posts/10158445672487527/

कॉन्‍टेस्‍टच्‍या अटी व नियमांच्‍या माहितीसाठी लिंक: https://www.sabtv.com/en_in/tnc/unlock_khushiyan_contest__t_amp_c/1513

असल्‍यास एसएमएस शुल्‍क लागू असेल.

वैशाली शर्मा, प्रमुख – मार्केटिंग अॅण्‍ड कम्‍युनिकेशन्‍स, सोनी सब: म्हणाले, ”हा अनपेक्षित काळ आहे आणि सोनी सबमध्‍ये आम्‍ही आमच्‍या प्रेक्षकांमध्‍ये आनंद पसरवण्‍याच्‍या आमच्‍या मिशनशी कटिबद्ध आहोत. आम्‍ही आमच्‍या ऑन-एअर कन्‍टेन्‍टमधून, तसेच लोकांच्‍या जीवनांमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकणा-या अर्थपूर्ण मोहिमांच्‍या माध्‍यमातून या वचनाची पूर्तता केली आहे. ‘अनलॉक खुशियाँ’ अगदी नावाप्रमाणेच आमच्‍या प्रेक्षकांना समान ध्‍येयाप्रती एकत्र आणत अधिक आनंद पसरवण्‍याचा एक प्रयत्‍न आहे. तसेच आम्‍ही या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून वंचित मुलांचे जीवन सुधारण्‍याप्रती ‘सेव्‍ह दि चिल्‍ड्रेन फाऊंडेशन’ करत असलेल्‍या अविश्‍वसनीय कार्याला पाठिंबा देत आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading