Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENT

सोनी YAY! सादर करत आहे ‘पाप-ओ-मीटर’ फ्रँचायझीचा पहिलाच चित्रपट आणि नवीन शो ‘कृष्‍ण बलराम’

उत्‍सवी हंगाम जवळच येऊन ठेपला आहे आणि देशभरातील लहान मुले साजरीकरणाला सुरूवात होण्‍याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनी YAY! हे लोकप्रि‍य किड्स एंटरटेन्‍मेंट चॅनेल त्‍यांच्‍या दोन नवीन ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून मैत्री, साहस व आनंदाचा दुहेरी डोस देत हंगामामध्‍ये उत्‍साहाची भर करण्‍यास सज्‍ज आहे. पहिल्‍यांदाच पाप-ओ-मीटरची पात्रं त्‍यांचा स्‍वत:चा घोस्‍ट कॉमेडी चित्रपट ‘पाप-ओ-मीटर अंडर अॅटॅक’मध्‍ये पाहायला मिळणार आहेत. भूतलोकच्‍या भव्‍य चित्रपटासह अतूट मैत्रीच्‍या पौराणिक कथांवर आधारित नवीन शो ‘कृष्‍ण बलराम’पाहण्‍याचा देखील आनंद घेता येणार आहे.

साहसी कृत्‍यांचा पहिला अनुभव देणार आहेत भूतलोकचे मैत्रीपूर्ण भूत, जे पहिल्‍यांदाच चित्रपटपाप-ओ-मीटर’मध्‍ये दिसणार आहेत. या चित्रपटाच्‍या कथानकामध्‍ये रोमांचक घटनांचा समावेश आहे. भूत बॉसचा जुना प्रतिस्‍पर्धी भूतिया सिंग काही वर्षांपूर्वी भूत बॉसने भूतलोकमधून त्‍याला बाहेर काढण्‍याचा सूड घेण्‍याचा प्रयत्‍न करतो. या चित्रपटामध्‍ये भूतिया सिंगची भूतलोक व पाप-ओ-मीटरवर वर्चस्‍व मिळवण्‍याची योजना, तसेच पृथ्‍वीलोकवर भयाचे वातावरण निर्माण करण्‍यासाठी त्‍याचे मिशन पाहायला मिळेल. सुष्‍ट विरूद्ध दुष्‍टाच्‍या या संघर्षामध्‍ये कोणाचा विजय होईल? भूतिया सिंग भूतलोकचा नवीन बॉस बनणार का? तुमच्‍या आवडत्‍या भूतांना या पापविरोधात लढताना पाहण्‍यासाठी हा टेलि-चित्रपट पाहा.

धमाल मनोरंजन येथेच थांबत नाही. सोनी YAY! शो ‘कृष्‍ण बलराम’सह भावांमधील अतूट नात्‍याची ऐतिहासिक कथा सादर करत आहे. भावांची खोडकर व प्रेमळ जोडी गोपिकांची छेड काढताना, लोणी चोरताना आणि राक्षसांसोबत धाडसी संघर्ष करताना पाहायला मिळणार आहे. आणि फक्‍त एवढेच नाही! सोनी YAY! चॅनेल त्‍यांच्‍या लक्षवेधक कथांची शृंखला सादर करणार आहे. चार आकर्षक चित्रपटांमध्‍ये कृष्‍ण देवाचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे, हे चार चित्रपट आहेत – ‘कृष्‍ण दि बर्थ’,’कृष्‍ण माखनचोर’,’कृष्‍ण इन वृंदावन’ आणि ‘कृष्‍ण कंस वध’.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading