बॉलिवुड ड्रग्ज कनेक्शन – कंगना ने घेतली ‘या’ चार मोठ्या स्टार्स ची नावं
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं गूढ दिवसेंदिवस वाढत असताना त्यामध्ये अनेक नवनवे आणि मोठे खुलासे होत आहेत. या प्रकरणात Rhea Chakraborty आणि Showik Chakraborty या दोघा भावंडांच्या WhatsApp Chats मधून सुशांत प्रकरणातलं ड्रग्ज कनेक्शन उघड झालं आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणात आता एनसीबी (Narcotics Control Beuro) देखील चौकशी करत असताना अभिनेत्री कंगना रनौतनं या ड्रग्जचं बॉलिवुड कनेक्शन उघड करणारा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कंगणानं म्हटलं होतं की, ‘बॉलिवुडमधले ९९ टक्के सेलिब्रिटी कधी ना कधीतरी ड्रग्ज घेत होते.’ कंगणाच्या या दाव्यानंतर आता तिने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून गंभीर टिप्पणी करत बॉलिवुडमधली ४ मोठी नावं घेतली आहेत.
या ट्वीटमध्ये कंगना म्हणते, ‘मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशलला विनंती करते की त्यांनी ड्रग्जच्या चाचणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने द्यावेत. अशी चर्चा आहे की हे चौघेजण Drug Addict आहेत. माझी इच्छा आहे की त्यांनी या चर्चा खोट्या ठरवाव्यात. बॉलिवुडमधली ही तरुण मंडळी जर चाचणीत स्वच्छ बाहेर पडली, तर ते लाखो लोकांसाठी प्रेरणा ठरू शकतील’. कंगणानं या चौघांना हे आवाहन उपहासानं खोचकपणे केल्याचं देखील सांगितलं जात आहे. या ट्वीटमध्ये कंगणानं पंतप्रधान कार्यालयाला देखील टॅग केलं आहे.
