Thursday, June 11, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात आज १५ हजार ७६५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह; ३२० जणांचा मृत्यू

पुण्यात १६९५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण, देशात पुणे शहर पोहचले नंबर १ वर

मुंबई, दि. १ : राज्यात आज १० हजार ९७८ रुग्ण बरे झाले तर १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९८  हजार ५२३ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १५,७६५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११४२ (३५), ठाणे- २४२ (७), ठाणे मनपा-२३३ (५), नवी  मुंबई मनपा-२९४ (६), कल्याण डोंबिवली मनपा-२०४ (१०), उल्हासनगर मनपा-२६ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३२ (१), मीरा भाईंदर मनपा-१७१ (१), पालघर-२७७ (१), वसई-विरार मनपा-१२८ (४), रायगड-३०८ (१४), पनवेल मनपा-२१० (२), नाशिक-८३ (२), नाशिक मनपा-४८५ (१५), मालेगाव मनपा-२६ (१), अहमदनगर-३९४ (२),अहमदनगर मनपा-३३० (२), धुळे-१७ (१), धुळे मनपा-४९ (३), जळगाव- ५१७ (९), जळगाव मनपा-१४७ (२), नंदूरबार-४२, पुणे- ७७६ (७), पुणे मनपा-१७३८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-९७९ (५), सोलापूर-३९९ (१४), सोलापूर मनपा-६८ (१), सातारा-७८० (१७), कोल्हापूर-१९२ (११), कोल्हापूर मनपा-८५ (५), सांगली-८०० (१३), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३७० (५), सिंधुदूर्ग-२३, रत्नागिरी-११६ (९), औरंगाबाद-८२ (३),औरंगाबाद मनपा-१०५ (५), जालना-९५ (३), हिंगोली-७ (१), परभणी-४३ (६), परभणी मनपा-६२ (१), लातूर-१५६ (१), लातूर मनपा-८० (१), उस्मानाबाद-२७३ (७),बीड-७३ (२), नांदेड-२०१, नांदेड मनपा-१४२ (३), अकोला-९९ (१), अकोला मनपा-४७, अमरावती-३० (२), अमरावती मनपा-४० (४), यवतमाळ-१५९ (२), बुलढाणा-१४७, वाशिम-१०७ (२) , नागपूर-३३६ (१), नागपूर मनपा-११५५ (२१), वर्धा-१३६ (१), भंडारा-८६ (१), गोंदिया-१०१ (१), चंद्रपूर-१३०, चंद्रपूर मनपा-१३३, गडचिरोली-४१, इतर राज्य १६.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ११ हजार ७५२ नमुन्यांपैकी ८ लाख ०८ हजार ३०६ नमुने पॉझिटिव्ह (१९.१९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ७९ हजार ५१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ०२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८ टक्के एवढा आहे.

*पुणे शहर ..!

  • दिवसभरात 1695 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 1419 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 28 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 97068

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 15247

  • एकूण मृत्यू – 2332
  • एकूण डिस्चार्ज- 79489

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading