Thursday, June 11, 2026
PUNE

ज्येष्ठ वेशभूषाकार सदाशिव कांबळे यांचे निधन

पुणे, दि. 5 – ज्येष्ठ वेषभूषाकार आणि रंगभूषाकार सदाशिवराव कांबळे यांचे वृद्धापकाळाने बुधवारी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, चार मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सहा दशकांपासून नाट्यसृष्टीत कार्यरत असलेले कांबळे हे कलाकारांमध्ये कांबळे मामा या नावाने लोकप्रिय होते.

‘जाणता राजा’, ‘नटसम्राट’ आणि ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकांचा कपडेपट कांबळे यांनी सांभाळला होता. क्षणार्धात बाजूबंद बांधणारे, बाराबंदीच्या नाड्या आवळणारे आणि फेट्यामध्ये शिपरेच चढविणारे कांबळे मामा कलाकारांमध्ये लोकप्रिय होते. ‘संत बसवेश्वर’, ‘महात्मा फुले’, महाराष्ट्राची लोकधारा’ या नाटकांसह ‘संत तुकाराम’, ‘गाढवाचं लग्न’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी वेशभूषा केली होती. राज्य शासनातर्फे सांस्कृतिक पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चित्रकर्मी पुरस्काराचे मानकरी असलेल्या कांबळे मामा यांचा पुणे महापालिकेने बालगंधर्व पुरस्कार वितरण कार्यक्रमात विशेष सन्मान केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading