Thursday, June 11, 2026
ENTERTAINMENT

अलाद्दिन पुन्‍हा शापित! यास्‍मीन अलाद्दिनला कशाप्रकारे मानवी रूपात आणणार?

मल्लिकाच्‍या (देबिना बॅनर्जी) खंजरच्‍या (सुरा) तुकड्यांच्‍या शोधामध्‍ये असलेला अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) नवीन विश्‍वामध्‍ये पोहोचला आहे. सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ने धक्‍कादायक वळण घेतले आहे. खंजरच्‍या दुस-या तुकड्याची रक्षणकर्ता राजकुमारी तमन्‍नाने (आराधना शर्मा) अलाद्दिनला एका मांजरामध्‍ये बदलले आहे. प्रेक्षकांनी रोमहर्षक ट्विस्‍ट्स पाहण्‍यासाठी सज्‍ज राहा, जेथे मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मधील स्थिती अधिक आव्‍हानात्‍मक व रहस्‍यमय बनणार आहे.

मल्लिकाच्‍या खंजरचा पहिला तुकडा यशस्‍वीरित्‍या संपादित केल्‍यानंतर अलाद्दिन व टीम पुढील गंतव्‍याकडे निघतात. हे गंतव्‍य राजकुमारी तमन्‍ना व तिचा रहस्‍यमय राजवाडा आहे. अलाद्दिन राजवाड्यामध्‍ये पोहोचल्‍यानंतर सिंहासनावर एका मांजरीला बसलेली पाहतो, जी क्षणात सुंदर राजकुमारीमध्‍ये बदलते. खंजरचा पुढील तुकडा मिळवण्‍यामध्‍ये राजकुमारी तमन्‍नाच मदत करू शकते, हे समजल्‍यानंतर अलाद्दिन तिच्‍याकडे मदत मागतो. पण रागाच्‍या भरात तमन्‍ना अलाद्दिनला मांजरामध्‍ये बदलते.

दुसरीकडे यास्‍मीन (आशी सिंग) व फराज (आमिर दळवी) यांना अलाद्दिन परत न आल्‍यामुळे त्‍याच्‍याबाबत चिंता वाटू लागते. त्‍यांना समजते की, तमन्‍नाने अलाद्दिनला मांजरामध्‍ये बदलले आहे. अलाद्दिन यास्‍मीनला एका पोर्टलमध्‍ये घेऊन जातो, जेथे त्‍यांना अनेक लोक मांजराच्‍या रूपात दिसतात,ज्यांना तमन्‍नानेबदलले असते.

अलाद्दिन व यास्‍मीनला समजते की खंजरचा पुढील तुकडा पोर्टलमध्‍ये आहे, जे फक्‍त मनुष्‍यच पार करू शकतो. यास्‍मीन दुविधेमध्‍ये सापडते. अलाद्दिनला मानवी रूपात आणण्‍यासाठी दुस-या कोणालातरी स्‍वत:चे बलिदान देत मांजरामध्‍ये बदलावे लागणार आहे.

सिद्धार्थ निगम म्‍हणाला,”आगामी एपिसोड्ससाठी शूटिंग करण्‍याचा अनुभव आगळावेगळा होता. आम्‍ही या एपिसोड्ससाठी ख-या मांजरासह शूटिंग केली. मला सांगावेसे वाटते की, हे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक आहे. माझी भूमिका अलाद्दिन यापूर्वी कधीच सामना न केलेल्‍या खडतर आव्‍हानांचा सामना करत आहे. आगामी एपिसोड्स अलाद्दिन व यास्‍मीनला अशा टप्‍प्‍यावर आणणार आहेत, जेथे यास्‍मीनला अलाद्दिन पुन्‍हा मूळ मानवी रूपात येण्‍यासाठी खडतर निर्णय घ्‍यावा लागणार आहे. ते सर्व काळाच्‍या विरोधात धावत आहेत आणि सुल्‍ताना यास्‍मीन अलाद्दिनला वाचवण्‍यासाठी कोणता निर्णय घेते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असणार आहे.”

आशी सिंग म्‍हणाली,”यास्‍मीनला अत्‍यंत महत्त्वाचा निर्णय घ्‍यावा लागणार आहे. मल्लिकाच्‍या खंजरचा पुढील तुकडा शोधण्‍यासाठी अलाद्दिनला एका पोर्टलमध्‍ये प्रवेश करावा लागणार आहे, जेथे फक्‍त मनुष्‍यच प्रवेश करू शकतो. यास्‍मीनसमोर मोठे आव्‍हान आहे, जेथे तिला अलाद्दिनला पुन्‍हा मानवी रूपात बदलण्‍यासाठी बलिदान द्यावे लागणार आहे. या एपिसोड्ससाठी शूटिंग करण्‍याचाअनुभव रोमांचपूर्ण राहिला आहे. प्रत्‍येक एपिसोड नवीन व खडतर आव्‍हाने घेऊन येत आहे. मी ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’च्‍या आगामी एपिसोड्सबाबत प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading