Wednesday, October 28, 2026
NATIONAL

देशात मागील २४ तासांत तब्बल ५६ हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्ण

नवी दिल्ली, दि. ६ – देशातील कोरोनाचा कहर दिवसागणिक तीव्र होत आहे. आज सलग आठव्या दिवशी देशात ५० हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ५६ हजार २८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९०४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची आता १९ लाख ६४ हजार ५३७ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ४० हजार ६९९ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ५ लाख ९५ हजार ५०१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर १३ लाख २८ हजार ३३७ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असली तरी कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंताजनक आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बलाढ्य महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसला आहे. तर अमेरिकेपाठोपाठ ब्राझील आणि भारतातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत आहे.

Leave a Reply