भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये इंडक्शन प्रोग्रॅम
पुणे, दि. ३ – भारती विद्यापीठच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ च्या एमबीए, एमसीए अभ्यासक्रमाच्या २०२० या शैक्षणिक वर्षाच्या नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रॅम ला २ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. ७ सप्टेंबर पर्यंत हा सात दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम चालणार असून या विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची ओळख करून देण्यात येणार आहे ,अभ्यासक्रमाची उद्दिष्टे समजावून सांगितली जात आहेत. मांयक्रोसॉफ्ट मीट द्वारे हा इंडक्शन प्रोग्रॅम ऑनलाईन होत आहे. ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. सात दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम मधून डॉ पवन अगरवाल (मुंबई ),संध्या भसीन (दिल्ली ),ललित कुमार (बंगळुरू ),संजय महॉबीया (ऑस्ट्रेलिया ) हे नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पहिल्या दिवशी एमबीए ,एमसीए या अभ्यासक्रमांचे २५० विद्यार्थी उपस्थित होते . ‘आयएमईडी’ च्या पौड रस्तायेथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला.
