Wednesday, September 2, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात आज नवीन रेकॉर्ड १८ हजार १०५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; ३९१ जणांचा मृत्यू

पुण्यात दिवसभरात १७६४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ;

मुंबई, दि.३: राज्यात आज १३ हजार ९८८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. आज १८ हजार १०५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०५  हजार ४२८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १८,१०५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३९१ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१५२६ (३७), ठाणे- २७१ (३), ठाणे मनपा-३४८ (११), नवी  मुंबई मनपा-३५९ (१०), कल्याण डोंबिवली मनपा-३९४ (१), उल्हासनगर मनपा-७३, भिवंडी निजामपूर मनपा-२०, मीरा भाईंदर मनपा-१७५ (३), पालघर-१४३ (१), वसई-विरार मनपा-२०७ (९), रायगड-४२८ (४), पनवेल मनपा-२८६ (१), नाशिक-१६६ (८), नाशिक मनपा-७०८ (६), मालेगाव मनपा-२४ (१), अहमदनगर-४७३ (३),अहमदनगर मनपा-२६५ (३), धुळे-३०१ (१), धुळे मनपा-२२६ (२), जळगाव- ४१६ (१४), जळगाव मनपा-१०० (२), नंदूरबार-८५ (४), पुणे- १०५८ (२३), पुणे मनपा-१८७३ (४७), पिंपरी चिंचवड मनपा-९७९ (८), सोलापूर-४६५ (११), सोलापूर मनपा-७६ (४), सातारा-६७० (२५), कोल्हापूर-३२७ (२५), कोल्हापूर मनपा-१४१ (५), सांगली-४६३ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३८२ (७), सिंधुदूर्ग-८३, रत्नागिरी-१३५ (३), औरंगाबाद-१००,औरंगाबाद मनपा-१८६ (३), जालना-९७ (४), हिंगोली-३३ (३), परभणी-६६ (३), परभणी मनपा-५० (२), लातूर-२०२ (६), लातूर मनपा-७० (२), उस्मानाबाद-२९० (९), बीड-१०० (४), नांदेड-१७६ (४), नांदेड मनपा-१२२ (१), अकोला-१९ (१), अकोला मनपा-५५ (३), अमरावती- ३३ (१), अमरावती मनपा-१८५, यवतमाळ-१७४ (२), बुलढाणा-१७५ (६), वाशिम-६४ (१), नागपूर-२७१ (१), नागपूर मनपा-१३४९ (३०), वर्धा-११०, भंडारा-१३, गोंदिया-१७५, चंद्रपूर-१२३, चंद्रपूर मनपा-८१, गडचिरोली-२१, इतर राज्य- १९ (३).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४३ लाख ७२ हजार ६९७ नमुन्यांपैकी ८ लाख ४३ हजार ८४४ नमुने पॉझिटिव्ह (१९.२९ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख २७ हजार ३१६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३ टक्के एवढा आहे.

पुणे ३ सप्टेंबर

  • दिवसभरात १७६४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ११८८ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात ४८ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. २२ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ८८५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५३० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १००४५९.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५९७३.
  • एकूण मृत्यू -२४०१.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ८२०८५.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६७३४.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading