Wednesday, August 19, 2026
Latest NewsPUNE

बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतींना शिवसृष्टीत रांगोळीद्वारे अभिवादन

पुणे : लोकप्रिय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसृष्टी येथे त्यांच्या पवित्र स्मृतींना रांगोळीद्वारे अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र, स्वराज्याचा गौरवशाली इतिहास आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा घराघरांत पोहोचविणारे बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.

नागपंचमी हा बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्मदिवस. या निमित्ताने दरवर्षी शिवसृष्टी येथे त्यांना अभिवादन करण्यात येते. यंदाही त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.

बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी पाच रांगोळी कलाकारांनी तब्बल तीन दिवस परिश्रम घेऊन त्यांचे रांगोळीचित्र साकारले. ही रांगोळी उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली. दरवर्षी बाबासाहेबांची रांगोळी साकारणारे विराज मगर, श्रीराम महामुनी, नीलम शिवतारे, पूनम पवार आणि स्वप्नील निवंगुणे या कलाकारांचा यावेळी शिवसृष्टीतर्फे सत्कार करण्यात आला.

शिवसृष्टीचे विश्वस्त अमृत पुरंदरे आणि  विनीत कुबेर, कार्यकारी अधिकारी अनिल पवार, प्रमोद साळुंखे,  विलास कोळी, अक्षय अरसूल यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करत त्यांच्या पवित्र स्मृतींना उपस्थितांनी अभिवादन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading