सुरक्षित आरसीएस मेसेजिंगसह भारतात स्पॅम संरक्षण वाढवण्यासाठी एअरटेल आणि गुगलचा सहयोग
पुणे: भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा प्रदात्यांपैकी एक असणाऱ्या भारती एअरटेल आणि गूगल यांनी भारतातील लाखो वापरकर्त्यांना सुरक्षित आणि आकर्षक मेसेजिंग अनुभव देण्यासाठी सहयोगात काम करण्याची घोषणा केली आहे. एअरटेलची नेटवर्क इंटेलिजन्स आणि गूगलच्या रिच कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस (आरसीएस) प्लॅटफॉर्म तसेच स्पॅम फिल्टरिंग यांचा संगम करून, वापरकर्त्यांना उच्च-गुणवत्तेचे फोटो/व्हिडिओ आणि मेसेज रिअॅक्शन्ससारख्या परस्परसंवादी वैशिष्ट्यांसह आरसीएस मेसेजिंगचा अनुभव मिळेल. त्याचबरोबर, सुधारित संरक्षणामुळे मोबाईल स्पॅम आणि डिजिटल फसवणूक लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.
मागील दीड वर्षात, एअरटेलने कॉल्स आणि संदेशांमधून ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने उद्योगातील पहिल्या एआय-सक्षम उपक्रमांच्या मालिकेद्वारे भारतातील स्पॅम आणि डिजिटल फसवणुकीविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व केले आहे. ग्राहक संरक्षणातील उत्तम कामगिरी करत, एअरटेलने आपल्या सर्व नाविन्यपूर्ण स्पॅमविरोधी उपक्रमांद्वारे आतापर्यंत तब्बल 71 अब्ज स्पॅम कॉल्स आणि 2.9 अब्ज स्पॅम एसएमएस रोखले आहेत. यामुळे त्याच्या नेटवर्कवरील आर्थिक नुकसानीच्या मूल्यात तब्बल 68.7% घट झाली आहे.
तरी देखील, डिजिटल परिसंस्थेमध्ये एक महत्त्वाची सुरक्षा उणीव अद्याप कायम आहे. पारंपरिक मोबाईल नेटवर्क्स, जी मेसेजिंग सेवा देतात, ती सुरक्षा मानकांखाली आणि टेलिकॉम-स्तरीय संरक्षण व्यवस्थेसह कार्यरत असतात; परंतु अनेक नॉन-टेलिकॉम संवाद प्लॅटफॉर्म्स आणि स्वतंत्र अॅप्समध्ये अशी संरक्षण व्यवस्था नसते. परिणामी, या माध्यमांचा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या गैरप्रवृत्तीच्या घटकांकडून वाढत्या प्रमाणात दुरुपयोग केला जात आहे आणि ती आर्थिक फसवणूक व हानिकारक स्पॅमसाठी सामान्य साधने बनली आहेत.
एअरटेल आणि गूगल यांच्यातील हे नाविन्यपूर्ण सहकार्य ते अंतर भरून काढण्यासाठी करण्यात आली आहे आणि आधुनिक मेसेजिंग अनुभवापर्यंत टेलिकॉम-स्तरीय संरक्षणाची जबाबदारी वाढविण्यात येत आहे. एअरटेलची नेटवर्क इंटेलिजन्स आरसीएस प्लॅटफॉर्ममध्ये आणि गूगलच्या विद्यमान स्पॅम संरक्षण प्रणालीमध्ये एकत्रित करून, दोन्ही कंपन्या कॅरिअर-समर्थित मेसेजिंग सेवेसाठी एक नवा मानदंड प्रस्थापित करत आहेत.
भारती एअरटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष गोपाल विट्टल म्हणाले, “एअरटेलमध्ये आम्ही ग्राहक संरक्षणाबाबत अत्यंत कटिबद्ध आहोत आणि भारतातील स्पॅमविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहिलो आहोत. डेटा, बुद्धिमान नेटवर्क्स आणि सातत्यपूर्ण नवकल्पना यांच्या सहयोगाने आम्ही आमच्या ग्राहकांचे संपूर्ण संरक्षण सुनिश्चित करतो. एक अग्रगण्य उपक्रम म्हणून, आम्ही आता गूगलसोबत भागीदारी करून ग्राहक संरक्षण टेलिकॉम क्षेत्राच्या पलीकडे विस्तारले आहे आणि समृद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित केला आहे. आता आम्ही व्यापक ओटीटी संवाद प्लॅटफॉर्म्सनाही आमच्यासोबत सहकार्य करण्याचे आवाहन करतो, जेणेकरून ग्राहकांना स्पॅम आणि आर्थिक फसवणुकीच्या धोक्यापासून संरक्षण मिळेल.”
गूगलमधील अँड्रॉइड इकोसिस्टमचे अध्यक्ष समीर समत म्हणाले, “भारतामधील एअरटेलसोबतची ही अग्रगण्य भागीदारी मोबाईल वापरकर्ते आत्मविश्वासाने संवाद साधतील याची खात्री करण्यात मदत करते. आम्ही कॅरिअर्सच्या व्यापक परिसंस्थेसोबत सातत्याने काम करून मेसेजिंग सुरक्षेचे मानकीकरण करण्यास आणि जगभरातील सर्व आरसीएस मेसेजिंग वापरकर्त्यांसाठी सुसंगत व विश्वासार्ह मेसेजिंग अनुभव निर्माण करण्यास कटिबद्ध आहोत.”
ग्राहकांना वैध व्यावसायिक संदेश आणि स्पॅम यामधील फरक सहज ओळखता येण्याने एंटरप्राइझ संवादासाठी मेसेजिंग सेवेचा वापर करणाऱ्या ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करता येईल आणि कडक सुरक्षा तपासणी नसलेल्या इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सवर उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून संरक्षण मिळेल. या उपाययोजनांमुळे ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांसोबत अधिक सखोल संवाद आणि सहभाग निर्माण करता येईल, ज्यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षितता आणि नियंत्रणाची भावना मिळेल. याच्या परिणामी, दीर्घकालीन ग्राहक संबंध प्रस्थापित होतील, जे व्यवसायाच्या वाढीसाठी आणि यशासाठी अत्यावश्यक असतात.
