Tuesday, April 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

 

सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. हातात “बायको पाहिजे” असे पोस्टर्स घेऊन उन्हातान्हात फिरणारा हा तरुण सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या तरुणाचं नाव आहे धनराज धोंडीराज दांगट. धनराजवर अशी वेळ का आली? बायको शोधण्यासाठी तो इतका वणवण का भटकतो आहे? आणि हा सगळा प्रयत्न नेमका कशासाठी? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

मुंबईतील बस स्टॉप, रेल्वे स्टेशन जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे जाऊन धनराजने आपल्या आयुष्याचा साथीदार मिळवण्य़ासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्याचा हा हटके आणि धाडसी प्रयत्न सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून, अनेकांच्या कुतूहलाला कारणीभूत ठरत आहे.

आता या सगळ्या प्रयत्नांना यश मिळतं का? धनराजला त्याची अपेक्षित “बायको” सापडते का? की त्याच्या शोधाची गोष्ट आणखी वेगळं वळण घेते? हे सगळं पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading