Saturday, November 14, 2026
Latest NewsPUNE

सूर महती महोत्सवाची सुरेल सुरुवात

पुणे : प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ सूर महती फाउंडेशनतर्फे आयोजित दोन दिवसीय सूर महती महोत्सव २०२६ चा शुभारंभ आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे येथे झाला. उद्घाटन प्रसंगी डॉ. अनुराधा नारळकर, डॉ. हरी सहस्रबुद्धे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद कांबळे, कपिश जोशी, प्रख्यात व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे, हार्मोनियमवादक प्रमोद मराठे आणि सूर महती फाउंडेशनचे आयोजक अतुल खांडेकर उपस्थित होते.

महोत्सवाची सुरुवात सुरश्री जोशी आणि चिन्मयी ओक यांच्या सुरेल गायन जुगलबंदीने झाली. राग मुलतानीने सुरुवात करून त्यांनी एकतालातील विलंबित बंदिश “गोकुळ गाव के छोरा” सादर केली. त्यानंतर मध्यलय तीनतालातील बंदिश “पकरा मोरी बैयाँ”आणि तराणा सादर केला. सादरीकरणाची सांगता “रमैया की दुल्हनिया” या निर्गुणी भजनाने झाली. त्यांना तबल्यावर प्रणव गुरव आणि हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव यांनी साथ केली.

Leave a Reply