Tuesday, April 21, 2026
Latest NewsTECHNOLOGY

महिलांसाठी सुरक्षित डिजिटल संवादाला नवा अर्थ देण्यासाठी एफआरएनडी कडून ‘सुरक्षित कन्व्हर्झेशन्स’ लाँच

 

पुणे : भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची पुढची लाट टियर २-४ शहरांमधून ऑनलाइन येत आहे. अशा वेळेस विशेषत: सार्थक संपर्काच्या शोधात असणाऱ्या महिलांच्या दृष्टीने सुरक्षितता हा डिजिटल विश्वासाचा निर्णायक घटक म्हणून पुढे येत आहे. भारताचा अवतार-आधारित ऑडिओ सोशल डिस्कव्हरी प्लॅटफॉर्म आणि इंटरॅक्ट ग्रुपचे प्रमुख उत्पादन असलेल्या एफआरएनडी ने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुरक्षित कन्व्हर्झेशन्स‘ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मच्या महिला-प्रथम सुरक्षा डिझाईनवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या मोहिमेच्या माध्यमातूनडिजिटल सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवणे आणि या प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी आदरयुक्तसुरक्षित संवादाची संस्कृती निर्माण करणे हे एफआरएनडी चे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणूनकंपनी सुरक्षित ऑनलाइन वर्तनधोके ओळखणे आणि प्लॅटफॉर्मच्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा जास्तीत जास्त वापर करणे यांविषयी महिला वापरकर्त्यांना शिक्षित करण्यासाठी नियमित इन-अॅप सत्रे आयोजित करणार आहे. याशिवाय एफआरएनडी वापरकर्त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा रिअल-टाइम समर्थन आणि मार्गदर्शन पुरविण्यासाठी २४  टोल-फ्री हेल्पलाइन सुरू करणार आहे. अधिक सुरक्षित आणि अधिक समावेशक डिजिटल इकोसिस्टम तयार करण्याच्या भारत सरकारच्या दृष्टिकोनाशी ही मोहीम सुसंगत आहे. टियर २ ते ४ बाजारपेठेतील महिलांना ज्ञान आणि सुलभ मदत प्रणालींसह सुसज्ज करण्याचा ती प्रयत्न करणारी आहे जेणेकरून विश्वास हा प्रत्येक संवादाच्या केंद्रस्थानी राहील.

एफआरएनडीची निर्मिती भारतीय वापरकर्त्यांसाठी करण्यात आली असून सुरक्षितता ही या उत्पादनाच्या आर्किटेक्चरच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर सध्या दररोज जवळजवळ दहा लाख संभाषणे केली जातातत्यासाठी व्हिडिओऑडिओ आणि चॅट संवादांचे निरीक्षण करणारी १०० सदस्यांची मॉडरेटरेशन टीम आणि रिअल-टाइम एआय सिस्टम यांचा आधार आहे.

सार्वजनिक रूम्समधील लाईव्ह मॉडरेशनपासून ते खाजगी संभाषणांमध्ये एआय-असिस्टेड तपासणीपर्यंत या प्लॅटफॉर्मच्या सुरक्षा प्रणाली गैरवापर वाढण्यापूर्वीच त्यांना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. महिला वापरकर्त्या एका समर्पित सुरक्षा केंद्राचा लाभ घेऊ शकताततिथे त्यांना वापरकर्त्यांना त्वरित चेतावणी देणेकाढून टाकणे किंवा ब्लॉक करणे संभव होते. त्यामुळे त्यांना प्रत्येक संवादावर पूर्ण नियंत्रण प्राप्त होते. वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे अधिक रक्षण करण्यासाठीव्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन रेकॉर्डिंग आणि चॅटचे स्क्रीनशॉट घेण्यास प्लॅटफॉर्मवर सक्त मनाई आहे. आक्षेपार्ह सामग्री शोधण्यासाठीरिअल टाइममध्ये चॅटचे विश्लेषण करण्यासाठी आणि वारंवार उल्लंघन करणाऱ्यांना अगदी त्यांनी नवीन डिव्हाइस किंवा ओळखीसह परत येण्याचा प्रयत्न केला तरीही ओळखण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर एआयचा वापर करण्यात येतो. व्हिडिओ संवादादरम्यान स्क्रीनच्या ८० टक्के भागामध्ये वापरकर्त्याचा चेहरा असेल अन्यथा स्क्रीन धूसर होईलअसे या प्लॅटफॉर्मचे डिझाईन आर्किटेक्चर आहे.

इंटरॅक्ट ग्रुपचे सह-संस्थापक आणि सीईओ भानू प्रताप सिंग तंवर म्हणाले, “भारतात सोशल नेटवर्क्सचा खोलवर विस्तार होत असतानासुरक्षितता हे आता एक आकर्षण राहिले नसून विश्वासाचा पाया बनली आहे. टियर २ ते ४ शहरांमधील अनेक महिलांसाठीत्यांना इंटरनेट किती सुरक्षित वाटेल हे त्यांच्या पहिल्या डिजिटल संवादातून ठरते. एफआरएनडी मध्ये आम्ही एआयमॉडरेशन आणि उत्पादन डिझाईन यांना एकत्र करून महिला-प्रथम सुरक्षा आर्किटेक्चर तयार केले आहे जेणेकरून संभाषणे सन्मा्नाचीहेतुपुरस्सर आणि सक्षम करणारे राहतील. सुरक्षित कन्व्हर्झेशन्स‘ हा या कटिबद्धतेला समोर आणण्याचा आणि आमच्या सिस्टममध्ये संरक्षणाचा आणखी एक स्तर जोडण्याचा आमचा मार्ग आहे. नियमित इन-अॅप सुरक्षा सत्रांपासून ते २४×७ टोल-फ्री हेल्पलाइनपर्यंतही मोहीम त्यांना आवश्यक असलेले ज्ञान आणि रिअल-टाइम मदत प्रदान करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.”

सुरक्षित कन्व्हर्झेशन्स‘ मोहिमेद्वारेएफआरएनडी सर्व प्लॅटफॉर्मवर परस्पर आदरयुक्त डिजिटल वर्तनाला प्रोत्साहन देणाऱ्या सुरक्षा वैशिष्ट्यांवर आणि समुदाय उपक्रमांवर प्रकाश टाकत आहे. भारताचे डिजिटल समुदाय वाढत असताना तसतसे संभाषणे किती होतात यावर नव्हेतर ती संभाषणे किती सुरक्षित वाटतात यावर सोशल प्लॅटफॉर्मचे भविष्य अवलंबून असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading