Tuesday, April 21, 2026
BusinessLatest News

रँक आणि निकालाच्या पलीकडे: एलेन ऑनलाइनच्या राईज टू द टॉप पॉडकास्टमध्ये एमएस धोनीचा भारताच्या पुढच्या पिढीशी संवाद

मुंबई : एलेन ऑनलाइनने राइज टू द टॉप ही विद्यार्थी संवाद मालिका सुरू केली आहे. यात देशभरातील यशस्वी तरुण एमएस धोनीसोबत संवाद साधतील. आपले प्रामाणिक प्रयत्न सर्वांसमोर मांडतील. याचा पहिला भाग आता एलेन ऑनलाइन यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आला आहे.

ही मालिका विद्यार्थी केंद्रित आहे. जी त्यांच्या महत्त्वाकांक्षाशंकाकुटुंबाकडून अपेक्षित असलेला आधार आणि निर्णायक टप्प्यांवर भर देईल. कोण किती वेळ अभ्यास करतो किंवा त्याचे मार्क यापेक्षा त्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेण्यावर या संवादाचा भर असेल. या संपूर्ण संवादाची धुरा धोनीच्या हातात असेल. दबावाचा ताण आणि अपेक्षा यावर तो त्याच्या स्वतःच्या अनुभवांच्या आधारे भाष्य करेल. तर विद्यार्थ्यांना तो त्यांची गोष्ट सांगण्यास प्रोत्साहन देईल. दबाव आणि अपेक्षांमधून झालेला स्वतःचा प्रवास सांगतानाच धोनी संवादाची दिशा ठरवतो.

शुभारंभाच्या भागात, ‘सपने देखो’मध्ये ग्रामीण ओडिशातील शेख गालिब रझा आणि पश्चिम बंगालमधील एका दुर्गम गावातील अर्पिता घोष यांची गोष्ट आहे. हे दोघेही आता सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

अर्पितासाठी तिचा प्रवास घरापासूनच सुरू होतो. ज्या ठिकाणी मुळातच मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी आहे, अशा गावात ती लहानाची मोठी झाली आहे. आणि असे वातावरण असताना केवळ स्वतःची महत्त्वाकांक्षाच जपायची नाही, तर तिच्या वडिलांचेही स्वप्न तिला पूर्ण करायचे आहे. आपली मुलगी डॉक्टर झालेली पाहणे, हे तिच्या वडिलांचे स्वप्न आहे. कुटुंबाच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे, आपल्या गावातील पहिली डॉक्टर म्हणून परत येण्याचे तिचे ध्येय आहे.

आपल्या आईसोबत स्थानिक रुग्णालयात लहानपापासून दिलेल्या भेटीदरम्यान गालिबला डॉक्टर होण्याची इच्छा झाली. जिथे तो काळजीत असलेल्या कुटुंबांना डॉक्टर देत असलेला दिलासा पाहात असे. स्वतःच्या तब्येतीच्या तक्रारी असतानाही चिकाटीने प्रयत्न करत तो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो आहे. आणि याचेच फळ म्हणून शेवटी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला.

ही मालिका एका साध्या संदेशावर भर देते: आपली स्वप्ने आपल्या भौगोलिक ठिकाणावर अवलंबून नसते. देशभरातील लहान शहरे आणि खेड्यांमधून प्रेरणादायी कथा समोर येतात. ज्या शैक्षणिक कामगिरीइतक्याच दृढनिश्चयाने आकार घेतात.

एलेन ऑनलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश रंजन म्हणाले, “अनेकदा विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या निकालांवरून ओळखले जाते. पण त्यांना यासाठी तयार करणारा, घडवणारा प्रवास मात्र फारसा समोर येत नाही. हा प्रवास समोर आणणे हीच ‘राईज टू द टॉप’ची संकल्पना आहे. एमएस धोनी हा संवाद साधत असल्याने त्याचा एक वेगळाच परिणाम होतो. कारण, एकाचवेळी अपेक्षा पूर्ण करणे आणि दबावाचा त्याला अनुभव आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांसोबतचा हा संवाद अधिक परिणामकारक होतो.”

अनेक दशकांपासून, एलेनने शैक्षणिकदृष्ट्या कठीण अडथळ्यांवर मार्गक्रमण करणाऱ्या विद्यार्थी तसेच कुटुंबांसोबत जवळून काम केले आहे. ही मालिका म्हणजे त्या विद्यार्थी-प्रथम दृष्टिकोनाची विस्तारित आवृत्ती आहे, जी महत्त्वाकांक्षा, प्रामाणिकपणा आणि प्रगतीचा गौरव करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading