Thursday, April 9, 2026
BusinessLatest News

टाटा कॅपिटलचे मोठे पाऊल – ग्राहकांना जागरूक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देशव्यापी मोहीम 

मुंबई :  टाटा समूहाची प्रमुख आर्थिक सेवा कंपनीटाटा कॅपिटलने देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली आहे – ‘सवाल करोफिर लोन लो‘. भारतातील कर्ज सुविधांची वाढती पोहोच लक्षात घेताकोणतेही कर्ज घेण्यापूर्वी त्याबद्दल योग्य प्रश्न विचारणे आणि पूर्ण माहितीनिशीजागरूकतेने निर्णय घेण्यासाठी ग्राहकांना सक्षम करणेहा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आजच्या काळात कर्ज हा आपल्या जीवनशैलीचासुखाचा आणि स्वप्नांचा एक महत्त्वाचा भाग बनला आहेतंत्रज्ञानामुळे कर्ज मिळणे इतके सोपे झाले आहे कीआता कोणत्याही कागदपत्रांच्या कटकटीशिवाय त्वरित पैसे मिळतातपरंतुअशा काळात टाटा कॅपिटल तुम्हाला एक छोटीशी विनंती करत आहेथांबायोग्य प्रश्न विचारा आणि आपली जबाबदारी नीट समजून घ्याकारण एक समजूतदार निर्णयच तुमचे भविष्य सुरक्षित करू शकतो.

लॉन्च प्रसंगी टाटा कॅपिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ राजीव सभरवाल म्हणाले, “भारताच्या प्रगतीमध्ये इथल्या लोकांची मोठी स्वप्ने आणि कर्जाची सुलभ उपलब्धता यांची भूमिका मोलाची आहेटाटा कॅपिटलमध्ये आम्ही पारदर्शकता आणि जबाबदारीचे पालन यांना सर्वाधिक प्राधान्य देतो. ‘सवाल करोफिर लोन लो‘ या मोहिमेद्वारे आम्हाला प्रत्येक भारतीयाला जागरूक  सक्षम करायचे आहेजेणेकरून त्यांनी कर्ज घेण्यापूर्वी योग्य प्रश्न विचारावेत आणि आपल्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घ्यावीदेशातील प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि सुरक्षित व्हावा आणि देशात एक जबाबदार ‘क्रेडिट इकोसिस्टम‘ विकसित होत राहावीहेच आमचे ध्येय आहे.”

ही मोहीम डिजिटल प्लॅटफॉर्मसोशल मीडियामायक्रोसाइट्सब्लॉग्स आणि लघुपटांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात आणि सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचेलसोप्या भाषेतील माहिती आणि रंजक कन्टेन्टच्या आधारे जास्तीत जास्त लोकांशी जोडले जाणे आणि त्यांना जागरूक करणेहे आमचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading