पुणे : आजच्या काळात एकीकडे शेअर बाजारात तेजीची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे सावधगिरी बाळगण्याचीही गरज आहे. अशा परिस्थितीत, सामान्य गुंतवणूकदार भविष्यात चांगला नफा मिळवण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करत आहेत. सध्याच्या बाजारचक्रात ‘मिड-कॅप म्युच्युअल फंड’ पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत आहेत. या बदलत्या दृष्टिकोनामागे जागतिक आणि देशांर्गत, अशी दोन्ही कारणे आहेत. जागतिक स्तरावर, अमेरिका आणि युरोपसारख्या मोठ्या आर्थिक सत्तांमधील सुधारत असलेल्या व्यापारी संबंधांमुळे व्यवसायाचे वातावरण अधिक सुधारण्याची आशा आहे. या बदलांमुळे अशा कंपन्यांसाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, ज्यांचे कामकाज परदेशातील निर्यात आणि उत्पादन क्षेत्राशी जोडलेले आहे. देशांतर्गत पातळीवर विचार केल्यास, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, उत्पादन आणि भांडवली खर्चावर जो भर देण्यात आला आहे, त्याचा मोठा सकारात्मक परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होईल अशी अपेक्षा आहे. सरकारी खर्च वाढून खाजगी क्षेत्रात हालचाल वाढेल, तशी वस्तू आणि सेवांची मागणी केवळ मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित राहणार नाही. याचा थेट फायदा त्या मध्यम आकाराच्या कंपन्यांना मिळू शकतो, ज्या देशाच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून संपूर्ण २०२५ सालात ‘मिड-कॅप’ श्रेणीत गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स
Like this:
Like Loading...
Read More