कोटक लाइफ लॉन्चेस ‘कोटक सिग्नेचर लेगेसी’ टर्म प्लॅन
मुंबई : कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“कोटक लाइफ”) ने आज कोटक सिग्नेचर लेगेसी लॉन्च करीत असल्याची घोषणा केली. हा एक लाइफ टर्म प्लॅन आहे जो वय वर्षे 99 वर्षांपर्यंत वाढते लाइफ कव्हर देतो; यामुळे लोकांना त्यांच्या कुटुंबाची दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यास आणि एक स्थायी लेगेसी निर्माण करण्यास मदत होते.
कोटक सिग्नेचर लेगेसी हा 40 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या वास्तवाला प्रतिसाद देतो; त्यांच्या प्रगतीसोबत त्यांची सुरक्षा पुरेशी वाढलेली नाही.
करिअर पुढे जात असताना आणि जबाबदाऱ्या वाढत असताना, गृहकर्ज, EMIs, दीर्घकालीन कौटुंबिक उद्दिष्टे आणि अपेक्षा यांसारख्या आर्थिक वचनबद्धता सातत्याने वाढत राहतात. तरीही या टप्प्यावर अनेकांना असे वाटते की त्यांचे कव्हर पुरेसे नाही, कारण विद्यमान कव्हर अपुरे आहे किंवा दीर्घकाळामध्ये त्याचा पुनर्विचार केलेला नाही.
कोटक सिग्नेचर लेगेसी प्लॅन ही उणीव भरून काढतो. तो बदलती जीवनशैली आणि जबाबदाऱ्यांसोबत वाढणारी दीर्घकालीन सुरक्षा प्रदान करतो, आर्थिक सुरक्षिततेला बळकटी देतो आणि एक स्थायी लेगेसी निर्माण करण्यास प्रोत्साहन देतो.
कोटक लाइफचे व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश बालासुब्रमण्यम म्हणाले, “कोटक लाइफमध्ये आमचे वचन आहे की आम्ही अशी उत्पादने तयार करू आणि वितरित करू जी खऱ्या अर्थाने आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करतील. कोटक सिग्नेचर लेगेसी हा प्लॅन लोकांना त्यांच्या वाढत्या सुरक्षा गरजांसाठी सामर्थ्य देण्यास मदत करतो, एक असा प्लॅन देतो जो त्यांच्या जीवनप्रवासामध्ये त्यांची सोबत करतो. आमचा विश्वास आहे की हे उत्पादन कुटुंबांना विश्वास आणि मनःशांतीसह दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”
या प्रॉडक्टमध्ये दोन प्लॅन पर्याय आहेत:
- लेगेसी प्लॅन – संपूर्ण जीवन कव्हर (99 वर्षांपर्यंत) ज्यामध्ये लाइफ कव्हर सतत वाढत राहील
- लेगेसी प्लस प्लॅन – संपूर्ण जीवन कव्हर (99 वर्षांपर्यंत) ज्यामध्ये लाइफ कव्हर वाढत राहील आणि प्रीमियम परत मिळेल
या उत्पादनात अनेक अंगभूत फायदे आहेत, ज्यामध्ये गंभीर रोगांसाठी कव्हरेज, प्रीमियम पेमेंट टर्मदरम्यान अॅक्सीडेंटल डेथ बेनिफिट आणि प्रीमियम पेमेंट टर्मनंतर अॅक्सीलरेटेड क्रिटीकल इलनेस बेनिफिट यांचा समावेश आहे. ग्राहकांना आरोग्य आणि वेलनेस फायदे देखील मिळतात, ज्यामध्ये दर तीन वर्षांनी कॉम्प्लिमेंट्री मेडिकल चेक-अप* समाविष्ट आहे.
