Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विमान अपघाताचे गूढ उकलणारा प्राथमिक अहवाल लवकरच येणार

 

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची महत्वाची घोषणा

मुंबई प्रतिनिधी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताचे गूढ उकलण्यास उपयुक्त ठरणार असलेला प्राथमिक चौकशी अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत येणार असल्याची महत्वाची घोषणा नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने केली आहे.

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या नियमानुसार कोणताही विमान.अपघात घडल्यानंतर त्याच्या कारणांचा शोध घेणारा प्राथमिक चौकशी अहवाल 30 दिवसात सादर होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विमान अपघात तपास ब्युरोकडून चौकशीला वेग आला आहे.

या अहवालातून विमानाची तांत्रिक स्थिती, तत्कालीन हवामानाची स्थिती, वैमानिकाची शेवटच्या क्षणाची कृती या संदर्भात महत्वाची माहिती मिळू शकणार आहे.

विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी काही विदेशी कंपन्या आणि तपास यंत्रणेची मदत घेतली जात आहे. विमानाच्या डेटा रेकॉर्डरमधील माहिती मिळविण्यात यश आले आहे. मात्र, व्हॉईस रेकॉर्डरमधील माहिती मिळवण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे विमानात रेकॉर्डर बसवणाऱ्या कंपनीची मदत घेण्यात येत आहे.

या विमानाचा अपघात झाला नसून यामागे घातपात असल्याची शंका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या या खाजगी विमान वाहतूक कंपनी व्हीआरएसवर आरोप केले आहे. कंपनीला राजकीय वरदहस्त असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. तपास यंत्रणांवरही कालापव्यय करत असलेली टीका त्यांनी केली आहे.

या राश्वभूमीवर आपल्या जीवाला धोका असल्याची भीती खुद्द रोहित पवार यांनी व्यक्त केली. आपले कार्यकर्ते आणि खाजगी सुरक्षा यंत्रणा आपले रक्षण करतील. आपल्याला धोका असल्याचे सरकारला वाटत असले तर त्यांनी आपल्याला सुरक्षा द्यावी, असेही ते म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही रोहित पवार यांच्या म्हणण्याला दु जोरात येत रोहित पवार यांच्या बद्दल पवार कुटुंबीयांना काळजी असल्याचे मत व्यक्त केले. सरकारने त्यांना अतिरिक्त सुरक्षा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading