Monday, April 20, 2026
Latest NewsLIFESTYLE

‘लेन्सकेप केरळ’ छायाचित्र प्रदर्शन आणि ‘मास्टरक्लास’ चे पुण्यात आयोजन

 

पुणे  : ‘केरळ टुरिझम’ तर्फे ‘लेन्सकेप केरळ’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दहा नामवंत छायाचित्रकारांनी संपूर्ण केरळमध्ये टिपलेल्या १०० निवडक छायाचित्रांचा संग्रह सादर केला जाणार आहे.

केरळमधील लोकांचे वैविध्यपूर्ण जीवन, संस्कृती, निसर्गसौंदर्य, वन्यजीव आणि दैनंदिन जीवनातील क्षण अशा विविध विषयांना या प्रदर्शनात स्थान देण्यात आले आहे. दहा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून साकारलेले हे प्रदर्शन ‘गॉड्स ओन कंट्री’ म्हणजेच केरळचे एक चैतन्यमय आणि आधुनिक रूप प्रेक्षकांसमोर उभे करते.

हे प्रदर्शन १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान सकाळी ११:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत राजा रवि वर्मा गॅलरी, आर्ट टुडे स्टुडिओ, घोले रोड, शिवाजीनगर येथे असणार आहे या प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी (१९ फेब्रुवारी) प्रसिद्ध छायाचित्रकार सौरभ आनंद चॅटर्जी आणि बालन माधवन यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष ‘फोटोग्राफी मास्टरक्लास’ आयोजित केला जाईल.

प्रसिद्ध कला समीक्षक उमा नायर यांनी या प्रदर्शनाचे क्युरेशन (नियोजन) केले असून, पुरस्कार विजेते छायाचित्रकार बालन माधवन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या प्रदर्शनात एच. सतीश, शिवांग मेहता, अमित पसरिचा, सौरभ आनंद चॅटर्जी, सैबल दास, उमेश गोगना, मनोज अरोरा, ऐश्वर्या श्रीधर, नताशा कर्तार हेमराजानी आणि कौनतेय सिन्हा या दिग्गज छायाचित्रकारांच्या कलाकृती पाहायला मिळतील.

कार्यक्रमाचा तपशील

प्रदर्शन
१८ ते २० फेब्रुवारी २०२६
वेळ : सकाळी ११ ते रात्री ८पर्यंत
प्रवेश : विनामूल्य (मोफत)

मास्टरक्लास
१९ फेब्रुवारी २०२६
वेळ : दुपारी २ ते ४
मार्गदर्शक : प्रसिद्ध छायाचित्रकार सौरभ आनंद चॅटर्जी आणि बालन माधवन
प्रवेश : विनामूल्य (मोफत)

स्थळ : राजा रवि वर्मा गॅलरी, आर्ट टूडे स्टुडिओ, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading