देवदर्शन करून परतताना वाहनाचा अपघात; एका तरुणाचा मृत्यू तर सतरा जण जखमी
चंद्रपूर : महाशिवरात्रीनिमित्त पाटाळा येथील शिवमंदिरात त्रिशूल अर्पण करून जवळच. राळेगाव येथील जगन्नाथ मठात जात असताना भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी आहेत.
पाटाळा ते राळेगाव प्रवासात वाहन वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या कडेला उलटले. अपघात झाल्याचे लक्षात येताच गावकरी आणि इतर वाहनचालकांनी अडकलेल्या भाविकांना वाहनाखालून बाहेर काढले आणि वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात आले.
या अपघातात भूषण विजय दोडके (वय १७ रा. पाटाळा) याचा मृत्यू झाला. मयूर वनशिंगे (१६), राजू किसन शिवरकर (४२), राजू जाधव (४०), मंथन डाहूले (१३), लकी भडके (२०), नानाजी मरस्कोल्हे (७०), गणेश खापणे (४०), मारोती शिवरकर (४५), विनोद गौरकर (५०), रोशन माडवे (१७), मारोती बदखल (५०) आणि सोहम भोयर (१६), प्रवीण आवारी, गुरुवेश राजेश जाधव (१४), ओंकार शिवशंकर मांढरे (९), प्रतीक पारखी आणि रोहित झाडे हे जखमी आहेत.
