Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला

मुंबई: प्रतिनिधी

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनी वरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. या संवादात त्यांनी एक प्रकारे जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत पाठिंबा व्यक्त केला आहे.

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावून त्यांची जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून दिली. यावेळी, आमच्याबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाल्याचे पाहून आपल्याला अचंबा वाटला, असे ठाकरे म्हणाल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या मागण्यांचं सरकारने विचार करायला हवा, असेही ते म्हणाल्याचे सांगण्यात आले.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून वाढता पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील दोन आमदारांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. विरोधकांनी देखील जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच सर्व प्रकारची मदत केलेली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading