प्रा.दीप्ती पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी निवड
पुणे- इंदापूर तालुक्यातील बावडा येथील प्रा.सौ.दिप्ती दिनेश पाटील यांची साहित्य क्षेत्रातील अग्रणी असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे झालेल्या चौथ्या राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलनामध्ये, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक डॉ.शरद गोरे यांनी निवडीचे पत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.
प्राध्यापक दीप्ती दिनेश पाटील या बावडा येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयांमध्ये इंग्लिश विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत असून विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक आहे तसेच सध्या त्या पीएचडी करत आहेत,बहुभाषिक असलेल्या प्रा.पाटील यांनी मराठी,हिंदी व इंग्लिश भाषांमध्ये हि त्यांनी विपूल लेखन केले असून भाषा शास्त्राचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे,प्रेरणादायी व्याख्याता म्हणून हि त्या प्रसिद्ध आहेत,अनेक दिवाळी अंकांसाठी त्यांनी लेखन प्रकाशित झाले आहे तसेच त्यांनी रिसर्च जर्नल मध्येही त्यांच्या कविता व लेख प्रकाशित झाले आहेत,साहित्य परिषदेच्या माध्यमातून सुविचाराची पेरण करून सामाजिक आरोग्य सदृढ करून सजग समाज करण्यासाठी प्रामाणिक
प्रयत्न करणार असल्याची भावना यावेळी प्रा.दीप्ती पाटील यांनी व्यक्त केली त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
