व्होल्टासने गणेशोत्सव २०२५ साठी उत्सवी ग्राहक ऑफर्स सादर केल्या
पुणे : व्होल्टास लिमिटेड हा भारतातील टाटाच्या अधिपत्याखालील पहिल्या क्रमांकाचा एअर कंडिशनिंग ब्रँड यंदा गणेश चतुर्थीला ग्राहकांना आनंदित करण्यास सज्ज आहे, जेथे एअर कंडिशनर्स व होम अप्लायन्सेस विभागांमधील उत्पादनांच्या व्यापक श्रेणीवर अनेक उत्साहवर्धक ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. स्मार्ट राहणीमान, अधिक आरामदायीपणा व नाविन्यपूर्ण डिझाइन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या श्रेणीमधून भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी दैनंदिन अनुभव वृद्धिंगत करण्यावर ब्रँडचा सातत्यपूर्ण फोकस दिसून येतो. गणेशोत्सव जवळ आला असताना व्होल्टासचा त्यांच्या उत्पादन श्रेणीवर विशेष सूट व प्रमोशन्ससह साजरीकरणामध्ये अधिक उत्साहाची भर करण्याचा मनसुबा आहे, ज्यामधून खात्री मिळते की प्रत्येक कुटुंब या शुभ सणादरम्यान आरामदायीपणा व उत्साहपूर्ण क्षणांचा आनंद घेऊ शकते. या ऑफर्स निवडक उत्पादनांवर आणि रिटेल सहयोगींकडे मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहेत.
उत्सवी ऑफर्सची वैशिष्ट्ये:
- सोपे ईएमआय पर्याय: खरेदींना अधिक सोईस्कर आणि किफायतशीर करण्यासाठी स्थिर पेमेंट योजना.
- सवलतीच्या दरामध्ये इन्स्टॉलेशन: निवडक एअर कंडिशनर्सवर ७९९ रूपये + जीएसटीचे विशेष इन्स्टॉलेशन दर.
- मोफत इन्स्टॉलेशन: निवडक वॉटर हिटर्सवर उपलब्ध, ज्यामधून त्रासमुक्त सेटअपची खात्री मिळते.
- ट्रिपल झीरो ऑफर: पात्र उत्पादनांवर झीरो डाऊन पेमेंट, शून्य व्याजदर आणि झीरो डिलर पेआऊटचा आनंद घ्या.
- विस्तारीत ईमएआय मुदत: निवडक एनबीएफसीच्या माध्यमातून १६ व १८ महिन्यांचे दीर्घकालीन ईएमआय पर्याय उपलब्ध.
- निश्चित ईएमआय योजना: फक्त १०८८ रूपयांपासून सुरूवात, ज्यामुळे प्रीमियम अप्लायन्सेस अधिक प्रमाणात उपलब्ध होतात.
- कॅशबॅक बोनान्झा: निवडक बँक कार्ड्सवर जवळपास ६००० रूपयांची कॅशबॅक मिळवा.
यंदा, व्होल्टास त्यांच्या उत्पादन ऑफरिंग्जच्या नवीन श्रेणीवर आकर्षक सूट देत आहे. ग्राहक सर्वोत्तमता आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांची श्रेणी वाढवण्याप्रती प्रवासामध्ये व्होल्टासने विशेष कॅशबॅक आणि सुलभ ईएमआय योजनांसह अनेक ऑफर्स सादर केल्या आहेत. तसेच, घरामध्ये सुशोभीकरणाला प्रेरित करण्यासाठी ब्रँडने अनेक आर्थिक ऑफर्सची घोषणा केली आहे, जसे निवडक डेबिट व क्रेडिट कार्ड्सवर जवळपास १० टक्के कॅशबॅक आणि प्रत्येक खरेदीसाठी सुलभ निश्चित ईएमआय. उत्पादन व मॉडेलनुसार ऑफर किमतीचा विचार केला जाईल. ही ऑफर २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत वैध आहे.
सणाची प्रबळ सांस्कृतिक भावना आणि पारंपारिक खरेदी वर्तणूकीला अनुसरून व्होल्टासचा सणासाठी तयारी करणाऱ्या कुटुंबासाठी प्रीमियम अप्लायन्सेस अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे. विशेषत:, महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकमध्ये पारंपारिक खरेदीदरम्यान होम अपग्रेड्सवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे दिसून आले आहे, जेथे गणपती प्रतिष्ठापनेच्या वेळी अधिक खर्च केला जातो. वाढती मागणी व भावनिक प्रासंगिकतेसह गणेशोत्सव व्होल्टाससाठी ग्राहकांशी संलग्न होण्यासाठी, विक्रीला गती देण्यासाठी आणि निष्ठा वाढवण्यासाठी धोरणात्मक क्षण ठरत आहे.
”गणेशोत्सव आनंद, नवीन शुभारंभ व सर्वांनी एकत्र येण्याचा काळ आहे. व्होल्टासमध्ये आमचा ग्राहकांना आमच्या मर्यादित कालावधीच्या ऑफर्सच्या माध्यमातून अद्वितीय मूल्य व आरामदायीपणा देत या अनुभवाला अधिक वृद्धिंगत करण्याचा मनसुबा आहे. या ऑफर्ससह आम्हाला ग्राहकांना आकर्षक दरांमध्ये आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांसह त्यांची घरे अधिक सुशोभित करण्याची संधी देण्याचा आनंद होत आहे. या ऑफर्स व सूट ग्राहकांच्या जीवनात उत्सवी उत्साहाची भर करतील, तसेच त्यांना विनासायासपणे खरेदी अनुभव देतील. आम्ही आशा करतो की या ऑफर्स कुटुंबाच्या जीवनात आनंद व आरामदायीपणा आणतील, जेव्हा ते त्यांच्या घरामध्ये बाप्पाचे आगमन करण्यास सज्ज आहेत,” असे व्होल्टास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (नियुक्त) श्री. मुकुंदन मेनन म्हणाले.
या ऑफर्समधून भारतातील कुटुंबांना सणासुदीच्या काळादरम्यान मूल्य, नाविन्यता व आरामदायीपणा वितरित करण्याप्रती व्होल्टासची कटिबद्धता दिसून येते. ग्राहांना या मर्यादित कालावधीच्या फायद्यांचा आनंद घेण्यासाठी त्यांच्या जवळच्या व्होल्टास ब्रँड स्टोअर्सना भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
