Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम

 

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पक्षाची घोडदौड सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक नेते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. वास्तविक मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. मात्र, मोदी, शहा यांच्या धक्का तंत्राचा अवलंब करीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर साटम यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

अमित साटम हे अभ्यासू आणि आक्रमक नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पक्षाची घोडदौड सुरू राहील. सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या ते उत्तमपणे पार पाडतील आणि मुंबई महापालिकेची सत्ता महायुती पुन्हा प्राप्त करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading