Wednesday, September 16, 2026
BusinessLatest News

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘टाटा टी प्रीमियम – देश की चाय’कडून ‘देश का गर्व’ मोहिमेची नवी आवृत्ती

पुणे  : ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’चा प्रमुख चहा ब्रँड ‘टाटा टी प्रीमियम’ आपल्या ‘देश का गर्व’ मोहिमेच्या २०२५ आवृत्तीच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला मान देण्याची परंपरा यापुढेही सुरू ठेवत आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिन साजरा करताना ‘टाटा टी प्रीमियम’तर्फे चहाच्या दैनंदिन संस्कृतीला स्थानिक कलांशी जोडण्यात येते. त्यानुसार यंदा भारतातील प्रतिष्ठित कलाप्रकारांपासून प्रेरणा घेत तयार केलेल्या हस्तचित्रित किटलींच्या ‘देश का गर्व’ संग्रहामार्फत हा उपक्रम राबवला जात आहे.

‘टाटा टी प्रीमियम’ने चहा संस्कृतीचा भाग असलेल्या वस्तूंमधून, मग तो साधा कुल्हड असो, चहाचा पारंपरिक कप असो किंवा यावर्षीची प्रातिनिधीक किटली, भारताची समृद्ध लोककला आणि प्रादेशिक कला सतत प्रकाशझोतात आणल्या आहेत. यातील प्रत्येक आवृत्ती केवळ सौंदर्यापुरती मर्यादित नसून, भारताच्या कलात्मक वारशाचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांपर्यंत आधुनिकतेच्या आणि सार्थकतेच्या माध्यमातून पोहोचवणे हा खोल अर्थ असलेला उद्देश त्या मागे असतो. भारताच्या हस्तकलेचे सौंदर्य सगळे जग नव्याने शोधू लागले असताना, ‘टाटा टी प्रीमियम – देश की चाय’ हा ब्रॅंड मात्र हे सौंदर्य आपल्या दैनंदिन जीवनात पूर्वीपासूनच साजरे करत आला आहे. यावर्षी भारतीय लोककलेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘कौशलम’ संस्थेच्या सहयोगाने ‘देश का गर्व’ संग्रहात प्रादेशिक कलाप्रकारांपासून प्रेरणा घेतलेल्या हस्तचित्रित किटल्या सादर करण्यात आल्या आहेत.

या वर्षी ‘टाटा टी प्रीमियम’ने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक म्हणून वारली कला सादर केली आहे. ही कला सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली एक आदिवासी चित्रशैली आहे. काळ्या-पांढऱ्या रेषांमधून उभी राहणारी, लयबद्ध शैलीत गोष्टी सांगणारी ही कला लावणीची नर्तिका, शनिवार वाडा, ढोल-ताशा आणि मोर यांसारख्या पारंपरिक प्रतीकांतून साकारली गेली आहे. पारंपरिक वारली शैलीत चित्रित केलेली ही मर्यादित आवृत्तीतील किटली, महाराष्ट्राच्या आदिवासी परंपरेला अर्पण केलेली एक जिवंत कलाकृती ठरते.

यावर्षीच्या देश का गर्व मोहिमेला आधुनिक परिमाण मिळाले आहे एका दृश्यप्रधान आणि प्रभावी चित्रफीतीद्वारे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून तयार करण्यात आलेल्या या चित्रफीतीमध्ये भारतीय कलांचा समृद्ध पट आजच्या तरुण पिढीसमोर नव्या उंचीवर उलगडला जातो, पारंपरिकतेचा गाभा जपत! या फिल्मला प्रसिद्ध गायक आणि कलाकार पियूष मिश्रा यांनी अधिक भावनिक आणि कलात्मक परिमाण दिले आहे. त्यांचा अनोखा आवाज आणि अभिव्यक्ती हे या ब्रँड फिल्मला एक आगळी उंची देतात.

‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’चे पॅकेज्ड बेव्हरेजेस (भारत आणि दक्षिण आशिया) विभागाचे प्रमुख पुनीत दास म्हणाले, “टाटा टी प्रीमियम’मध्ये आमची स्थानिकतेवर आधारित धोरणे ही भारताच्या वैविध्यपूर्णतेवर आधारित आहेत आणि हे वैविध्यच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. ‘देश का गर्व – प्रदेश की कला’ या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही केवळ कलेचा गौरव करत नाही, तर भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करत आहोत. चहाच्या प्रत्येक किटलीतून एक अभिमानाची गोष्ट आम्ही उभी करीत आहोत, जी आता ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम केवळ स्वातंत्र्य दिनापुरता न ठेवता, दररोजच्या आयुष्यातही भारतीय संस्कृतीचा उत्सव साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये आम्ही कला आणि तंत्रज्ञानाची ताकद वापरतो आणि त्याद्वारे काळ, स्थळ आणि पिढ्यांच्या मर्यादा पार करत, दृश्यात्मक आणि प्रभावी कथन सादर करतो. यंदाच्या आवृत्तीत, ‘एआय’च्या सामर्थ्याचा उपयोग करून भारतीय कला जिवंत केली आहे आणि ती स्वातंत्र्य दिनाच्या गौरवास शोभेल अशीच झाली आहे.”

‘ट्री डिझाइन’ या कंपनीचे डिझाईन प्रमुख अर्णब चटर्जी म्हणाले, “आपल्या देशात आजही असे अनेक कलाकार आहेत, जे हाताने चित्र रंगवत पारंपरिक कथाकथनाच्या परंपरा जिवंत ठेवत आहेत. आम्ही त्याच पारंपरिक कलेचा उपयोग करून भारताच्या विविध कलाप्रकारांना एका सुंदर रूपात साकारले आहे आणि त्यांना चहाच्या किटल्यांवर जिवंत करून भारताच्या चहा संस्कृतीला एक मनापासूनची मानवंदना दिली आहे.”

‘क्रिएटिव्हलँड एशिया’चे ग्रुप चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर अझाझुल हक म्हणाले, “ही चित्रफीत ही अशी पहिलीच अनोखी ब्रँडेड कंटेंट फिल्म आहे. ती पूर्णपणे एआय व व्हीएफएक्स या माध्यमातून तयार करण्यात आली आहे. त्यातून स्थानिकता आणि भारतातील विविध कला-संस्कृतीचा भव्य उत्सव साजरा केला गेला आहे. कथक आणि ओडिशीसारखे नृत्यप्रकार प्रादेशिक प्रतिकाच्या माध्यमातून अभूतपूर्व, नेत्रसुखद व्हिज्युअल्समध्ये साकारणे हे एक मोठे आव्हान होते, कारण यापूर्वी फार कुणी असे काही केले नव्हते. ही भारताला दिलेली आमची मानवंदना ग्राहकांना नक्कीच भावेल, अशी आम्हाला आशा आहे.”

कौशलम संस्थेच्या संस्थापक मृणालिका जैन भारद्वाज यांनी सांगितले, “ही भागीदारी म्हणजे लोककलांना एक नवे माध्यम देण्याचा प्रयत्न आहे. परंपरा केवळ संग्रहालयात जपली जात नाही, तर ती रोजच्या आयुष्यातही जगली जाते, असे ‘कौशलम’मध्ये आम्ही मानतो. या किटल्या केवळ उपयोगी वस्तू नाहीत, तर त्या संस्कृतीचे कथन करणाऱ्या जिवंत कॅनव्हास आहेत. टाटा टी प्रीमियमसारख्या भारतातील एक प्रतिष्ठित ब्रँडशी नाते जोडले गेल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

यावर्षीचा ‘देश का गर्व’ संग्रह खास www.IndiakiChai.com या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या विक्रीतून मिळणारे उत्पन्न भारतीय लष्कराच्या कौशल्यविकास केंद्रांद्वारे महिलांच्या प्रशिक्षण व सक्षमीकरणासाछी शंभर टक्के वापरण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading