Monday, May 25, 2026
BusinessLatest News

क्लॅरिव्हेट साउथ एशिया इनोव्हेशन अवॉर्ड्स 2025 मध्ये यूपीएल लिमिटेडचा  कृषी व्यवसायातील सर्वोत्कृष्ट नवोन्मेषक म्हणून गौरव

मुंबई  – कृषी व्यवसाय श्रेणीतील क्लॅरिवेट साउथ एशिया इनोव्हेशन अवॉर्ड 2025 ने यूपीएल लिमिटेडला सन्मानित करण्यात आले आहे. शाश्वत कृषी उपायांमध्ये जागतिक पातळीवर ही कंपनी आघाडीवर आहे. 6 ऑगस्ट 2025 रोजी हॉटेल आयटीसी मराठामुंबई येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी नवोपक्रमांना चालना देणाऱ्या दक्षिण आशियातील संस्थांचा गौरव करण्यात आला.

कृषी क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवण्यासोबतच शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या यूपीएलला सलग तिसऱ्या वर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.

क्लॅरिवेटची पुरस्कार देण्याची पद्धत ही डेरवेंट स्ट्रेंथ इंडेक्स आणि जागतिक पेटंट डेटाच्या आधारे करण्यात आलेल्या कठोर संशोधनावर आधारित आहे. या मूल्यांकनात पेटंट दाखल करण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक समज तसेच व्यावसायिक प्रासंगिकता यांचा एकत्रितरित्या विचार केला जातो. तसेच या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या परिणामाचा देखील समावेश केला जातो. यूपीएलची सातत्यपूर्ण कामगिरी जागतिक शेतीसाठी परिवर्तनात्मक उपाय विकसित करण्यासाठी त्याचे नेतृत्व दर्शवते.

जागतिक अन्न सुरक्षा तसेच हवामानाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी यूपीएल ने अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सहयोगी संशोधनात गुंतवणूक करणे सुरू ठेवले आहे. या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी यूपीएल चे मजबूत तसेच व्यापक संशोधन कार्यक्रम आहेत. काळानुसार जगभरातील शेतकऱ्यांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे विविध उपाय तयार करण्यासाठी हे संशोधन कार्यक्रम धोरणात्मकरित्या डिझाइन केले आहेत. हे कार्यक्रम विविध भौगोलिक ठिकाणे तसेच विभागांमध्ये राबवले जातात. तसेच प्रभावी आणि शाश्वत कृषी प्रगतीसाठी शेतकरी-केंद्रित नवोपक्रमासह अत्याधुनिक विज्ञानाचे संयोजन करतात. या सर्व उपक्रमांमुळेच कृषी व्यवसाय क्षेत्रातील अग्रणी म्हणून त्यांचे स्थान अधिक भक्कम करते.

यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल हेड – आयपी, प्रोडक्ट रजिस्ट्रेशन आणि ओपनएजी आर अँड डी, डॉ. विशाल सोढा म्हणाले: “क्लॅरिव्हेटकडून पुन्हा एकदा सन्मानित झाल्याचा आम्हाला अभिमान तसेच आनंद आहे. नवोपक्रम, सहकार्य आणि तंत्रज्ञानाद्वारे शेतीमध्ये शाश्वततेची कल्पना राबवण्याच्या आमच्या ध्येयाची हा पुरस्कार पुष्टी करतो. आमच्या नावीन्यपूर्ण उपायांच्या साहाय्याने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading