आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत एमक्युअर फार्मास्युटिकल्सने 16% महसूल वाढ आणि कर वजा जाता 41% वाढ मिळवत उत्तम कामगिरी केली
पुणे : एमक्युअर फार्मास्युटिकल्सने (BSE:544210, NSE:EMCURE) 30 जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी त्यांचे एकत्रित आर्थिक निकाल आज जाहीर केले.
या तिमाहीत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवसायाने चांगली कामगिरी केली. सर्व विभागांनी चांगली कामगिरी केल्याने एमक्युअरच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात 22% नी वाढ झाली. तर उर्वरित व्यवसायात 42% वाढ झाली असून गती कायम राहिली आहे. नवीन लाँच आणि मार्केटमधील भागीदारीमुळे कंपनीच्या कॅनडातील व्यवसायात 16.4% वाढ झाली. युरोपमध्ये नवीन लाँचचे फायदे सुरुवातीलाच दिसून आले आणि त्यात 12.8% ची वाढ झाली.
सर्व प्रमुख विभागांची चांगली कामगिरी आणि डर्मा तसेच ओटीसीमधील नवीन उपक्रमांमुळे देशांतर्गत व्यवसायात 9.4% वाढ झाली. सनोफीसोबतच्या धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करून कंपनीने या तिमाहीत आपला देशांतर्गत व्यवसाय अधिक मजबूत केला. एमक्युअर आता कार्डिओ व्हस्क्युलर पोर्टफोलिओ सोबतच सनोफीच्या ओरल अँटी-डायबेटिक पोर्टफोलिओचे मार्केटिंग आणि वितरण करेल.
या निकालांबाबत एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले, “पहिल्या तिमाहीत सर्व व्यावसायिक विभागांमधील आमची कामगिरी चांगली राहिली आहे. आमचे लक्ष्य निश्चित आहे आणि त्यानुसार फोकस मार्केटमध्ये इन-लायसन्सिंग आणि इन-हाऊस डेव्हलपमेंटद्वारे आम्ही आमचा पोर्टफोलिओ वाढवतो आहोत. सॅनोफी सोबत विस्तारित केलेल्या भागीदारीमुळे वेगाने वाढणाऱ्या मेटाबोलिक सेगमेंटमध्ये आमचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. आमच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी एक मजबूत उत्पादन पाइपलाइन देखील आम्ही तयार केली आहे जी, आमच्या प्रगतीला चालना देईल. याचबरोबर मार्जिनमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आम्ही कार्यक्षमतेवर अधिक भर देत आहोत.”
