भारतीय स्वयंपाकघरासाठी बर्गनर इंडियाने महाराष्ट्रात ‘अर्जेन्ट क्लासिक प्रेशर कुकर’ सिरीज लॉन्च केली
पुणे : प्रीमियम कुकवेअर इनोव्हेशनमध्ये आघाडीवर असलेल्या बर्गनर इंडियाने महाराष्ट्रासाठी आपली नवीनतम अर्जेन्ट क्लासिक प्रेशर कुकर सिरीज सादर केली आहे. या प्रसंगी एक खास डीलर मीट आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील प्रमुख डीलर्स आणि व्यावसायिक भागीदारांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा उद्देश बर्गनरच्या उत्पादन नवकल्पनांचे सादरीकरण करणे, व्यावसायिक संबंध बळकट करणे आणि भारतीय ग्राहकांना सुरक्षित, विषमुक्त व आधुनिक कुकवेअर सोल्यूशन्स देण्याची ब्रँडची कटिबद्धता अधोरेखित करणे हाच होता.
या प्रसंगी बर्गनर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक श्री. उमेश गुप्ता म्हणाले,”महाराष्ट्रातील आमचे डीलर नेटवर्क ब्रँडची प्रादेशिक उपस्थिती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अर्जेन्ट क्लासिक सिरीज केवळ सुरक्षित व टिकाऊच नाही, तर ती आधुनिक भारतीय स्वयंपाकघराच्या गरजांनुसार डिझाइन करण्यात आली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात ही सिरीज सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो, कारण येथे स्वयंपाक ही केवळ गरज नसून संस्कृती आणि अभिमानाचा भाग आहे.”
या डीलर मीटचा मुख्य आकर्षण ठरला अर्जेन्ट क्लासिक प्रेशर कुकर सिरीजचा अधिकृत शुभारंभ. ही नवीन सिरीज कार्यक्षमता, सुरक्षा आणि आधुनिक सोयी यांचा उत्कृष्ट संगम सादर करते. यामध्ये १ लिटरपासून ८ लिटरपर्यंत क्षमतेचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये खास ३.५ लिटर व ५ लिटरचे प्रेशर पॅन्स समाविष्ट आहेत. सर्व कुकर आरामदायक ग्रिप हँडल, स्मूद आउटर-लिड लॉकिंग सिस्टम, दुहेरी सुरक्षा वैशिष्ट्ये आणि गॅस व इंडक्शन दोन्ही कुकटॉप्सशी सुसंगत डिझाइनसह सादर केले गेले आहेत.
बर्गनरने या प्रसंगी आपला खास शौर्य ट्राय-प्लाय इनर लिड बेली शेप्ड प्रेशर कुकर देखील सादर केला, जो उत्तम उष्णता वितरण, समान शिजवणं आणि आरोग्यदायी स्वयंपाकासाठी डिझाइन केला गेला आहे. याचा बेली शेप (पोटरीच्या आकाराचा) तो स्मार्ट व आधुनिक स्वयंपाकघरासाठी योग्य पर्याय बनवतो.
कार्यक्रमादरम्यान बर्गनरची ट्रायप्रो सिरीज देखील प्रदर्शित करण्यात आली, जी भारतीय स्वयंपाकघरांसाठी डिझाइन केलेली किफायतशीर ट्राय-प्लाय कुकवेअर श्रेणी आहे. ही पुढाकार ब्रँडच्या त्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे, ज्यात भारतातील घरांमध्ये विषमुक्त व उच्च-गुणवत्तेचे कुकवेअर अधिक सुलभ करणे हे उद्दिष्ट आहे.
ही डीलर मीट बर्गनर इंडियाच्या एक रणनीतिक पुढाकाराचा भाग आहे, ज्याचा उद्देश प्रादेशिक बाजारात आपली खुद्रा भागीदारी बळकट करणे, नवकल्पना-आधारित उपायांद्वारे व्यावसायिकांना सक्षम बनवणे आणि जगमान्य दर्जाचे कुकवेअर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरापर्यंत पोहोचवणेहा आहे.
