खासदार मेधा कुलकर्णी यांची ‘ईश्वरपुरम्’ संस्थेला भेट
पुणे : ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यात फुलगांव येथील ‘ईश्वरपुरम्’ संस्थेच्या वतीने वसतिगृह चालविले जाते. अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांतील ४० विद्यार्थी या वसतिगृहात राहून शेजारच्या लोकसेवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत.
पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नुकतीच या संस्थेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी नियोजित शेती विषयासंबंधीत स्कील डेव्हलपमेंट सेंटरच्या परिसराची पाहणी केली आणि या केंद्राच्या उभारणीसाठी योग्य ते सहकार्य ‘खासदार निधी’तून देण्याचे आश्वासनही दिले.
यावेळी ‘ईश्वरपुरम्’चा सन २०२४-२५ चा वार्षिक अहवाल खा. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी ‘ईश्वरपुरम्’ संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, कार्यवाह बाळासाहेब चांदेरे, कोषाध्यक्ष प्रशांत जोशी, संदीप पूरकर, कृष्णकांत सातव, जालिंदर तारळकर, पंकज चांडक, स्वप्रील जगताप, नवनाथ वागसकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
