गोदरेज इंडस्ट्रीजच्या केमिकल्स व्यवसायाने क्षमता विस्तारासाठी 750 कोटींहून अधिक गुंतवणूक करण्याचा घेतला निर्णय
मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केमिकल व्यवसायाने २०३० पर्यंत USD 1 अब्ज जागतिक व्यवसाय वाढीच्या योजनेच्या अनुरूप महत्त्वपूर्ण क्षमतेच्या विस्ताराची घोषणा केली आहे. पुढील काही वर्षांत 750 कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचा एकूण निधी योजलेला असून, कंपनीने अनेक प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे.
कंपनीने आपल्या फॅटी अल्कोहोल आणि युरिक ॲसिड क्षमतेचा दुप्पट विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, अनुक्रमे 35,000 टन प्रति वर्ष आणि 20,000 टन प्रति वर्ष अतिरिक्त क्षमतेची भर घालणार आहे. विशेष उत्पादनांच्या क्षमतेत 21,000 टन प्रति वर्ष वाढ करून ती तीनपट करण्यात येईल, तर ग्लिसरीन क्षमतेत 24,000 टन प्रति वर्ष वाढ करून ती दुप्पट केली जाईल. फर्मेंटेशन क्षमतेतही 1,500 टन प्रति वर्ष वाढ करून तीनपट वाढ करण्याचे नियोजन आहे. प्राथमिक सर्फॅक्टंट्स क्षमतेतही 30,000 टन प्रति वर्ष वाढ करण्याचा मानस आहे, तसेच कंपनीच्या शाश्वत कार्यप्रणालीला पाठिंबा देण्यासाठी, हायब्रिड पॉवर क्षमतांमध्ये सुधारणा करून नवीनीकरणीय ऊर्जेचा वापर 75 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.
गोदरेज इंडस्ट्रीज (केमिकल्स) चे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल शर्मा यांनी सांगितले, “दर वर्षी दुप्पट अंकांच्या उत्पादन व महसूल वाढीचा सातत्याने अनुभव घेत असताना, गोदरेज केमिकल्ससाठी हा अत्यंत उत्साहवर्धक काळ आहे. संशोधन आणि विकास, तसेच कमर्शियल टीममध्ये केलेल्या महत्त्वाच्या गुंतवणुकांमुळे शाश्वत कार्यप्रणाली व हरित उत्पादनांबाबत आमची बांधिलकी स्पष्ट होते, ज्यामुळे ग्राहकांसाठीच्या सर्व बाजारपेठांच्या विभागांमध्ये नावीन्यपूर्ण उपाय देण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती मिळते. आमच्या क्षमतेतील वाढीचा प्रस्ताव २०३० पूर्वी USD 1 अब्ज जागतिक व्यवसाय होण्याच्या आमच्या दीर्घकालीन आकांक्षांशी जुळतो. आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने, मी आमचे ग्राहक, पुरवठादार आणि हितधारकांचे मनापासून आभार मानतो, ज्यांच्या आधारामुळे आम्ही प्रत्येक वर्षी ठोस प्रगती करत आहोत.”
कंपनीने हरित रसायनशास्त्राला (Green Chemistry) आपला वाढीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानले आहे. ऊर्जा कार्यक्षम प्रक्रिया, नवीनीकरणीय ऊर्जा स्वीकारणे आणि शून्य कचरा ध्येयांद्वारे पर्यावरणीय प्रभाव कमी करत असतानाच, कंपनी बायोकॅटालिसिस, सतत उत्पादन (Continuous Manufacturing) आणि फर्मेंटेशन या तंत्रांचा वापर करून, हरित, कार्यक्षम आणि सौम्य नावीन्यपूर्ण उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे आजची घोषणा कंपनीच्या शाश्वतता, नवोपक्रम आणि ग्राहकांच्या गरजांनुसार सानुकूलित उपाययोजनांवरच्या ठाम लक्षाचे पुनरावलोकन करते.
