Thursday, June 4, 2026
BusinessLatest News

इन्वेस्को म्युच्युअल फंडने इन्वेस्को इंडिया इनकम प्लस आर्बिट्राज अॅक्टिव फंड ऑफ फंड ही नवीन योजना सादर केली

 

एनएफओ 2 जुलै 2025 रोजी खुला झाला असून 16 जुलै 2025 रोजी बंद होईल

– इन्वेस्को म्युच्युअल फंडने आज आपल्या नवीन योजनेची – इन्वेस्को इंडिया इनकम प्लस आर्बिट्राज ॅक्टिव फंड ऑफ फंड – घोषणा केली. (ही एक ओपन एंडेड फंड ऑफ फंड योजना आहे, जी सक्रियपणे व्यवस्थापित करण्यात येणाऱ्या डेट-आधारित योजनांमध्ये आणि इक्विटी आर्बिट्राज योजनांमध्ये गुंतवणूक करते.) ही योजना पारंपरिक डेट गुंतवणुकीला एक स्मार्ट आणि सोपा पर्याय देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

ही योजना सक्रियपणे व्यवस्थापित करण्यात येणाऱ्या डेट-आधारित योजनांमध्ये आणि इक्विटी आर्बिट्राज योजनांमध्ये गतिशील पद्धतीने गुंतवणूक करून उत्पन्न निर्माण करण्याचा उद्देश ठेवते. ही योजना स्थिरता, कर कार्यक्षमता आणि व्यवहार सुलभता यांचा एक अनोखा मिलाफ प्रदान करते. दीर्घकालीन दृष्टीने कर सवलतीसह कमी जोखमीचे उत्पन्न शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

मुख्य वैशिष्ट्ये :

● मूळ गुंतवणूक

सुमारे 60-65% गुंतवणूक डेटआधारित योजनांमध्ये केली जाईल, ज्यामध्ये मुख्य भर Invesco India Debt Fund वर असेल. या योजनांद्वारे AAA-रेटेड कॉर्पोरेट बाँड्स आणि सार्वभौम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली जाते. सध्याच्या बाजारस्थितीनुसार, Invesco India Corporate Bond Fund मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल.

या फंडामध्ये सध्या 2 ते 5 वर्षे कालावधीतील AAA रेटेड कॉर्पोरेट बाँड्स आणि 5 ते 15 वर्षे कालावधीतील G-Sec मध्ये गुंतवणूक केली जाते. डेट योजनांमध्ये एकूण गुंतवणूक 65% पेक्षा कमी असेल.

सुमारे 35-40% गुंतवणूक Invesco India Arbitrage Fund मध्ये केली जाईल. हा फंड कॅश आणि डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमधील किंमतीतील फरकांचा लाभ घेतो आणि पूर्णपणे हेज केलेली इक्विटी एक्स्पोजर प्रदान करतो.

● सक्रिय व्यवस्थापन

बाजाराच्या परिस्थितीनुसार डेट आणि आर्बिट्राज योजनेतील डायनॅमिक रीबॅलन्सिंग केल्यामुळे जोखीम आणि परताव्याचे संतुलन राखले जाते.

  • करकार्यक्षमता

गुंतवणूक 24 महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवली गेल्यास, त्यावर केवळ 12.5% दीर्घकालीन भांडवली नफा कर (LTCG) लागतो,  तर पारंपरिक डेट योजनांवर इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जातो.

उद्घाटनाच्या वेळी बोलतांनाश्री विकास गर्गहेड ऑफ फिक्स्ड इनकम आणि फंड मॅनेजरइन्वेस्को म्युच्युअल फंड म्हणाले, “गुंतवणूक क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीतपारंपरिक गुंतवणूकदार त्यांच्या जोखीमेच्या क्षमतेनुसार आणि कर कार्यक्षमतेत वाढ करणाऱ्या पर्यायांची मागणी करत आहेतफिक्स्ड इनकम मार्केट सद्यस्थितीत अनुकूल स्थितीत असतानाइन्वेस्को इंडिया इनकम प्लस आर्बिट्राज ॅक्टिव फंड ऑफ फंड पारंपरिक डेट गुंतवणुकीला एक स्मार्ट पर्याय आहेआर्बिट्राज आणि फिक्स्ड इनकम धोरणांचा एक कार्यक्षम संगमजो तुलनेने कमी जोखमीसह आणि अधिक कर कार्यक्षमता प्रदान करतो.”

एनएफओ दरम्यान किमान गुंतवणूक रक्कम ₹1,000/- असून त्यानंतर ₹1/- च्या पटीत गुंतवणूक करता येईल. एसआयपी गुंतवणुकीसाठी किमान अर्ज रक्कम ₹1,000/- असून त्यानंतर ₹1/- च्या पटीत गुंतवणूक करता येईल. गुंतवणूकदारांना कोणताही एग्झिट लोड आकारला जाणार नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading