Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

पं उपेंद्र भट यांचा आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने सन्मान 

पुणे : किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं उपेंद्र भट यांचा शनिवारी अमृत महोत्सव वर्षानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर आणि सुमनताई किर्लोस्कर यांच्या हस्ते हा सत्कार झाला. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शुभदा जोशी, मित्रविंदा भट, आनंद भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

“मी प्रथम पुण्यात आलो, तेव्हा गुरुजी भीमसेनजी यांना सांगितले की, मला मराठी भाषा येत नाही आणि इथे माझे कुणीही नाही. तेव्हा गुरुजी मला एवढेच म्हणाले होते, की तुम्ही गाणं चांगलं करा, तुम्हाला इथे कधीच कमी पडणार नाही,” त्यांचे आशीर्वाद खरे झाले. मी कृतज्ञ आहे कारण रसिकांचे प्रेम लाभले आहे,’.

सन्मानावेळी फोटोत (डावीकडून) शिल्पा जोशी, श्रीनिवास जोशी, पं उपेंद्र भट, मित्रविंदा भट, माउली टाकळकर, सुमनताई किर्लोस्कर, शुभदा मुळगुंद आणि माया भट.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading