स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबचा आदर्श चोरघडेची महाराष्ट्राच्या १६ वर्षाखालील संघामध्ये निवड !!
पुणे : पुण्यातील स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबचा आदर्श चोरघडेची महाराष्ट्राच्या १६ वर्षाखालील संघामध्ये निवड करण्यात आली आहे. मूळच्या परभणीच्या असलेल्या या अष्टपैलु खेळाडूने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघातील आपले निश्चित केले.
बीसीसीआयच्या विजय मर्चंट करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १६ वर्षाखालील संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये आदर्श याने सात सामन्यांमध्ये आदर्शने धावा आणि विकेट घेत अष्टपैलू चमक दाखवली. आदर्शने वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. २०२२ मध्ये त्याने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबचे संचालक आणि प्रशिक्षक सागर सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. आदर्शच्या या यशामागे अविरत परिश्रम आणि अथक मेहनत होती. आपल्या कौशल्याला त्याने कठोर कष्टाची ताकद लावली आणि त्याच्या या प्रयत्नांचे त्याला फळ मिळाले.
एमसीएच्या १६ वर्षाखालील गटाच्या निमंत्रित स्पर्धेत आदर्शने उत्तम कामगिरी करून राज्य संघाचे दार ठोठवले होते. त्याची कामगिरी सर्वोत्तम १६ खेळाडूंमध्ये असल्याने अष्टपैलु खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश केला गेला आहे.
