Saturday, November 7, 2026
BusinessLatest News

७५ टक्के जेन-झी आणि मिलेनियल्स अधिक प्रवास करत असल्याचा एअरबीएनबीचा निष्कर्ष

 

पुणे : भारतातील कौटुंबिक सुट्टीला एक नवीन अर्थ प्राप्त होत आहे, कारण प्रवासी केवळ नवीन ठिकाणे शोधण्यापलीकडे जाऊन विविध पिढ्यांमधील प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. एअरबीएनबीच्या आंतरपिढी प्रवासावरील नवीन सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, चारपैकी तीन (७५ टक्के) जेन-झी आणि मिलेनियल प्रतिसादक वेगवेगळ्या पिढ्यांमधील कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवास करण्याची अधिक शक्यता आहे. हे एकत्र येणे, सामायिक अनुभव आणि अर्थपूर्ण नातेसंबंधांवर केंद्रित असलेल्या सुट्ट्यांमधील त्यांची वाढती आवड दर्शवते.

हा बदल एअरबीएनबीवरील मोठ्या ग्रुपच्या निवासाच्या मागणीमध्ये दिसून येत आहे. एअरबीएनबीच्या अंतर्गत डेटानुसार किमान एक मूल किंवा बाळ असलेल्या पाच किंवा अधिक पाहुण्यांच्या गटांच्या निवासासाठीच्या देशांतर्गत शोधांमध्ये मागील काही वर्षांत ५५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एकत्र कौटुंबिक सहलींपासून ते प्रियजनांना एका छताखाली एकत्र आणणाऱ्या सुट्ट्यांपर्यंत हे निष्कर्ष प्रवासाच्या आवडीनिवडी ठरवण्यात नातेसंबंध आणि क्वालिटी टाइमचे महत्त्व अधोरेखित करतात.

एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत सिंग बजाज म्हणाले, “कौटुंबिक सुट्ट्या या भारतीयांच्या प्रवासाचा नेहमीच एक महत्त्वाचा भाग राहिल्या आहेत. तरुण पिढीत वेगवेगळ्या पिढ्यांना एकत्र आणण्यात वाढती आवड निर्माण होत असून प्रवास हा पुन्हा जोडले जाण्याची, नवीन आठवणी निर्माण करण्याची आणि एकमेकांसोबत अर्थपूर्ण वेळ घालवण्याची संधी बनत असल्याचे दिसते. एअरबीएनबीमध्ये मोठ्या समूहाच्या निवासाच्या वाढत्या मागणीत हे दिसून येत आहे. इथे पाहुणे संपूर्ण घराचा वापर करू शकतात, एकत्र स्वयंपाक करू शकतात, वेळ घालवू शकतात आणि अविस्मरणीय अनुभव निर्माण करू शकतात.”

या बदलात ‘जनरेशन झी‘चा मोठा वाटा आहे. दहापैकी सात (७० टक्के) जण म्हणतात की, काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता ते वेगवेगळ्या पिढ्यांसोबत प्रवास करण्याची अधिक शक्यता आहे आणि मागील वर्षभरात ६०% पेक्षा जास्त लोकांनी मित्र आणि पालक या दोघांसोबत प्रवास केला आहे.

मिलेनियल्समध्ये हे प्रमाण अनुक्रमे ४९ टक्के आणि ४६ टक्के आहे. या पिढीसाठी सोबतीला सर्वाधिक महत्त्व आहे: एअरबीएनबीच्या ‘नेव्हर द सेम‘ अहवालानुसार चारपैकी तीन ‘जनरेशन झी‘ प्रवाशांच्या मते ते कुठे जातात यापेक्षा ते कोणासोबत प्रवास करतात हे अधिक महत्त्वाचे आहे.हाच हेतू त्यांच्या बुकिंग करण्याच्या पद्धतीत दिसून येत आहे. भारतीय ‘जेन झी‘ प्रवाशांच्या ग्रुप बुकिंगमध्ये देशांतर्गत पातळीवरही काही वर्षांत सुमारे ५५  टक्के वाढ झाली आहे. ते प्रवासाचे नियोजन करतात तेव्हा सुमारे ५० टक्के लोक संपूर्ण घर, व्हिला किंवा अपार्टमेंटला प्राधान्य देतात. हे या गोष्टीचे द्योतक आहे की तरुण प्रवाशांना संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी एक सामायिक जागा हवी आहे.आता मुक्काम हा ठिकाणाइतकाच जाणीवपूर्वक ठरवला जात आहे.

सुमारे दोन-तृतीयांश (६३ टक्के) प्रतिसादकांच्या मते त्यांना प्रेक्षणीय स्थळे पाहणे आणि फिरणे (५६ टक्के) यानंतर त्यांच्या निवासस्थानी आराम करणे आणि एकत्र वेळ घालवणे सर्वात जास्त आवडते. एकत्र जेवण करणे (५७ टक्के), खेळ खेळणे (४५ टक्के) आणि एकत्र चित्रपट किंवा कार्यक्रम पाहणे (३९ टक्के) अशा गोष्टींचाही पसंतीच्या उपक्रमांमध्ये समावेश आहे. यातून असे दिसते की रोजचे क्षण सुट्टीच्या अनुभवाचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतात.

एकत्र राहण्यावर दिलेला हा भर निवासस्थानाच्या पसंतीमध्येही दिसून येतो. संपूर्ण घर, व्हिला किंवा अपार्टमेंट पसंत असलेल्या प्रवाशांपैकी ८९ टक्केजण सर्वांना एकत्र वेळ घालवता येईल अशी सामायिक जागा असणे महत्त्वाचे मानतात. या प्रवाशांसाठी लिव्हिंग रूम किंवा सामायिक जागा (५८ टक्के), पुरेशा बेडरूम (५६ टक्के) आणि अनेक बाथरूम (५५ टक्के) ही सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

 

समुद्रकिनाऱ्यावरील सुट्ट्यांपासून ते निसर्गरम्य ठिकाणांपर्यंत प्रत्येक पिढीसाठी ठिकाणे

निसर्गाभिमुख सुट्ट्या हा एक लोकप्रिय पर्याय म्हणून समोर आला आहे. त्यात ५६ टक्के लोक पर्वत, ग्रामीण भाग किंवा निसर्गरम्य ठिकाणांना पसंती देतात. त्यापाठोपाठ समुद्रकिनारी असलेल्या सहली (४७ टक्के) आणि ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक स्थळे (४४ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

एअरबीएनबीवरील या सहलींमध्ये देशांतर्गत प्रवासाचा वाटा लक्षणीय आहे. तो पाच किंवा अधिक भारतीय गटांच्या शोधांपैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी हे प्रमाण १५  टक्क्यांपेक्षा जास्त आहे. एअरबीएनबी शोध ट्रेंड्स विविध प्रकारच्या देशांतर्गत स्थळांमधील आवडीही दर्शवतात. त्यात बंगळूर, गोवा, हैदराबाद, निलगिरी, पाँडिचेरी ही पाच किंवा अधिक पाहुण्यांच्या गटांसाठी सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या स्थळांमध्ये आहेत.

 

Leave a Reply