Saturday, November 7, 2026
Latest NewsSports

स्व. नेल्सन पॉल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‌‘बॉस्को कप‌’ स्पर्धेस ७ नोव्हेंबर पासून सुरूवात !!

पुणे :  स्व. नेल्सन पॉल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि सेलेझियन को-ऑपरेटर्स संस्थेच्या जगभरातील मिळून १५० व्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित ‌‘बॉस्को कप‌’ स्पर्धेत ३२ संघांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा दि. ७ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत येरवडा येथील डॉन बॉस्को स्कूलच्या मैदानावर होणार आहे.

स्पर्धेचे संचालक सिरिल असिरवदम, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्यारेलाल चौधरी आणि उपाध्यक्ष प्रदीप परदेशी यांनी सांगितले की, येरवडा युनिटचे सेलेझियन को-ऑपरेटर्स, ‌‘सॅक्रिड हार्ड पॅरिश‌’ आणि डॉन बॉस्को एज्युकेशनल कॉम्प्लेक्स्‌‍, येरवडा यांच्या संयुक्त विद्यमाने या निमंत्रित फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. नेल्सन पॉल यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि फुटबॉल खेळाडूंमध्ये क्रीडा नैपुण्य, शिस्त, सांघिक भावना व खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) यांच्या मान्यतेखाली आयोजित होत असून पीडीएफएच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणी गटातील ३२ संघांनी स्पर्धेत घेतला आहे. यामध्ये नॉईज बॉईज, सनी डेज्‌‍, फाल्कन एफसी, एम.व्ही.परदेशी एफसी, जाएंट्स एफसी, स्निग्मय एफसी, नव महाराष्ट्र एफसी, स्ट्रायकर्स एफसी, मस्का एफए, पुणे पायोनियर्स एफसी, केएमपी इलेव्हन, आर्यन्स्‌‍ एफसी, इन्व्हेडर्स एफसी, लौकिक फुटबॉल ॲकॅडमी, खडकी ब्ल्युज्‌‍, जीओबी ब, इन्फान्ट् एफसी, बेटा एफसी, एक्सवायझेड एफसी, फाल्कन ब, साई एफसी, हायलँडर्स एफसी, एफसी जोसेफ, डायनामाईट, युकेएम ब, एफसी शिवनेरी, रोअर एफसी, पुना सोशल एफसी, जुन्नर एफसी, स्पोर्ट्‌‍को एफए आणि पीसीएच एफसी असे ३२ संघ झुंझणार आहेत.

Leave a Reply