Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

विलक्षण श्रवणानंद देणारा पं. उल्हास कशाळकर यांचा ‘कौसी कानडा’

पुणे  : पं. उल्हास कशाळकर यांनी गायिलेला नायकी अंगाचा राग कौशी कानडा हा सवाईच्या श्रोत्यांसाठी विलक्षण श्रवणानंद देणारा ठरला. विलंबित एकतालात निबद्ध ‘नैया मोरी पार करो’ ही ख्यालाची बंदिश सादर करताना मालकंस आणि दरबारी कानडा यांचे अंश अतिशय कलात्मक पद्धतीने गुंफत, उल्हासजींनी अतिशय तन्मयतेने रागाचा विस्तार केला. ‘तुमबिन कौन करे लालन’ ही मध्यलय त्रितालातील बंदिशही रंगतदार झाली.

त्यानंतर राग सोहनी मध्ये त्यांनी ‘जियरा रे कल नही पावे’ (ताल रूपक) ही बंदिश आणि ‘देख बेग मन ललचाई रे’ ही त्रितालातील रचना सादर केली. ‘तुम हो जगत के दाता’ या रूपक तालातील बंदिशीने त्यांनी सांगता केली.

‘उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाच्या धक्क्यातून कुठलाही कलाकार अजून बाहेर येऊ शकलेला नाही. मी माझे गायन त्यांच्या स्मृतींना समर्पित करतो,’ अशा शब्दांत पं. उल्हास कशाळकर यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), ऐश्वर्य महाशब्दे आणि अद्वैत केसकर यांनी तानपुरा साथ केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading