Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सोमवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून परभणी येथे संविधान विटंबना विरोधी आंदोलनात मरण पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचे ते सांत्वन करणार आहेत. त्याचप्रमाणे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनाही ते भेट देण्याची शक्यता आहे.

परभणी येथे संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीन त्यांचा मृत्यू झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे तर हृदयविकाराच्या झटक्याने यांचा मृत्यू झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे..

राहुल गांधी सोमवारी सकाळी विमानाने नांदेड येथे येत असून नांदेड मधून परभणी येथे सूर्यवंशी कुटुंबीयांना ते भेटणार आहेत. त्याचवेळी बीड जिल्ह्यातील केज तालुका मस्साजोगा या गावाला भेट देऊन अपहरण आणि हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनाही ते भेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading