Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी

 

पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानिमित्त साहित्यीक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल विठ्ठल जाधव यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान दिले. त्यांनी रचिलेल्या रामायण या महाकाव्यातून श्रीराम यांच्या जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय तर होतोच तसेच त्यांचे आदर्श चरित्र आपणास आदर्श जीवन जगण्यास मार्दर्शन करते असे जाधव यांनी आपल्या व्याख्यानात बोलतांना सांगितले.

याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा.डॉ . ज्योती भाकरे ,वित्त व लेखा अधिकारी डॉ .चारुशीला गायके, अधिसभा सदस्य प्रा. डॉ. राजेंद्र घोडे, श्री. मुकुंद पांडे, श्री . कृष्णा भंडलकर, प्रा.डॉ. विलास आढाव, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब आंत्रे, श्री शिवाजी उतेकर,अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष गुलाब चव्हाण, संघटक नंदू वाडिया , खडकी ब्रिगेड पंचायतचे पदाधिकारी तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading