Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संस्कृत अभ्यासक वसंत गाडगीळ यांचे निधन

पुणे येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसंत अनंत गाडगीळ यांच वृद्धप काळानं वयाच्या ९५ व्या वर्षी पुण्यात निधन झालं . त्यांच्या मागे मुलगा श्रीवर्धन गाडगीळ , सून आणि नातू असा परिवार आहे . आज सकाळी ११ वाजता बैकुंठ स्मशान भुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

गाडगीळ हे झपाटलेलं व्यक्तिमत्व होतं . टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचं अध्ययन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेला प्रयास आणि त्यासाठी अमेरिका, आफ्रिकेमध्ये अनेक वेळा त्यांनी प्रवास केला होता .पं. वसंत गाडगीळ यांनी प्रत्येक वर्षी पुण्यात ऋषीपंचमी निमित्त ८० वर्षांवरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रांत सातत्यानं विधायक कार्य करणाऱ्या पुण्यातील व पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार ते घडवून आणत. ते संस्कृत भाषे विषयी नेहमी आग्रही असतं ते भाषण संस्कृतमध्येच करीत असत. प्रचिन ग्रंथ वेद उपनिषदे यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता . संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी शायदा संस्कृत नावाने ते मासिक चालवत होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading