Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळांना उद्या २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर

पुणे : पुणे शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून क्षमते पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसाने पुणे शहरातील पावसाचा 32 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली असून हजारो नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार उद्या २६ जुलै रोजी पुणे जिल्ह्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळांना उद्या २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज संध्याकाळी हे आदेश जारी केले आहेत.

या अंदेशा नुसार भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्याना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे.

दरम्यान, पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण 100 टक्के भरले असून सुमारे खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading